भाजप-शिंदे गटाचे स्वतंत्र पॅनल

जिल्हा दूध संघाची रणधुमाळी; माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार
भाजप-शिंदे गटाचे स्वतंत्र पॅनल

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी (District Milk Union Elections) भाजप-शिंदे (BJP-Shinde faction)गटाच्या पदाधिकार्‍यांची बैठक (meeting) शनिवारी शहरातील एका हॉटेलमध्ये झाली असून या बैठकीत भाजप - बाळासाहेबांची शिवसेना शिंदे (BJP - Balasaheb's Shiv Sena Shinde group) गटाकडून एकत्रितरित्या जिल्हा दूध संघात पॅनल (Create a panel together) तयार करण्यावर शिक्का मोर्तब करण्यात आला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा दूध संघाच्या माघारीनंतर जाहीर केली जाणार आहे. यात काही राष्ट्रवादी च्या (Including the leaders of NCP)नेत्यांचाही समावेश राहणार आहे.

भाजप-शिंदे गटाचे स्वतंत्र पॅनल
एकनाथराव खडसे म्हणतात : सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

गेल्या काही दिवसांपासून जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल होणार की दोन गट आमने-सामने लढणार, याविषयावर चर्चेला उधान आले होते. मात्र, शनिवारी भाजप- शिवसेना शिंदे गटाच्या दोन मंत्र्यांसह पदाधिकार्‍यांची बैठक होऊन एकत्रितरित्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल तयार करण्यावर निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सर्वपक्षीय पॅनलसंदर्भात होणार्‍या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा माघारीनंतर जाहीर केली जाणार आहे.

भाजप-शिंदे गटाचे स्वतंत्र पॅनल
जळगावच्या महापालिका आयुक्तांच्या कामकाजाचे लेखा परिक्षण व्हावे

यात काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचाही समावेश असून, जे सोबत येतील त्यांना घेवू आणि जे येणार नाहीत, त्यांच्या विरोधात निवडणूक लढविली जाईल. जिल्हा दूध संघात स्वतंत्र पॅनल तयार करण्यात येत असल्याने, प्रत्येक जागेवर कोणता उमेदवार दिला जाईल. तालुकानिहाय झालेले ठराव, कोणाच्या बाजूने किती ठराव येवू शकतात, अशा अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा रंगली, असे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

भाजप-शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चिमणराव पाटील, आ. किशोरआप्पा पाटील, आ. राजूमामा भोळे, आ. संजय सावकारे, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, अरविंद देशमुख, रोहित निकम, नंदकुमार महाजन यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते.

भाजप-शिंदे गटाचे स्वतंत्र पॅनल
गृहसचिवांसह तपासधिकार्‍यांना बजावली नोटीस

निवडणुकीला सामोरे जाऊन विजय मिळणारच

यापूर्वीच भाजपने सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यास कोणतीही हरकत नाही. मात्र, त्यात आमदार एकनाथराव खडसे राहणार नाहीत, अशीही भूमिका भाजपने घेण्यात आली होती. दरम्यान,एकनाथराव खडसेंना सोडून राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकारी भाजप-शिंदे गटाच्या पॅनलमध्ये येण्यास तयार असतील. अशा नेत्यांची माघारीपर्यंत वाट पाहण्यात येईल,याबाबत देखील बैठकीत चर्चा रंगल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते या पॅनलमध्ये येण्यास इच्छुक असल्याचाही दावाही आमदार मंगेश चव्हाण यांनी केला होता. मात्र, जर कोणी आले नाही, तरी भाजप - शिवसेना शिंदे गटाचे स्वतंत्र पॅनल तयार असून जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीला सामोरे जाऊन विजय मिळणारच, असा दावाही आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे.

भाजप-शिंदे गटाचे स्वतंत्र पॅनल
धुळ्यात 27 लाखांची लूट

असे असतील संभाव्य उमेदवार

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी भाजप-शिंदे गटाच्या काही उमेदवारांची नावे जवळपास निश्चित करण्यात आलेली आहेत. यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोरआप्पा पाटील, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, अरविंद देशमुख, रोहित निकम हे उमेदवार जवळपास निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यामुळे इतर जागांवर कोणते उमेदवार निश्चित करायचे याबाबत प्राथमिक चर्चा या बैठकीत करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com