जळगाव जिल्हा बँकेच्या 106 वर्षाच्या इतिहासात ज्येष्ठ सभासदाने केले झेंडावंदन

ज्येष्ठ महिला सभासद श्रीमती पुष्पाताई चौधरी यांना मिळाला मान
जळगाव जिल्हा बँकेच्या 106 वर्षाच्या इतिहासात ज्येष्ठ सभासदाने केले झेंडावंदन

जळगाव jalgaon

एकेकाळी आशिया खंडात नावारूपाला असणारी दगडी बँक म्हणजेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेमध्ये चेअरमन म्हणून जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील राजकीय ज्येष्ठ नेत्यांनी चेअरमन पदाची धुरा सांभाळलेली आहे परंतु विद्यमान चेअरमन भाऊसाहेब संजय मुरलीधर पवार यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन झाल्यानंतर प्रथम झेंडावंदन त्यांच्या हातून होईल अशी बँकेची पद्धत आहे कारण यापूर्वी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या दोन्ही दिवशी झेंडावंदन करण्याचा मान हा जिल्हा बँकेचे चेअरमन कदाचित व्हाईस चेअरमन केव्हातरी संचालक यांनी केलेल आहे परंतु जळगाव जिल्हा बँकेला 106 वर्ष पूर्ण होत आहे आणि अशावेळी विद्यमान चेअरमन भाऊसाहेब संजयजी पवार यांनी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्रजी देशमुख यांना सूचना केल्या की जळगाव जिल्हा बँकेचे यावेळीच झेंडावंदन जळगाव जिल्हा बँकेच्या ज्येष्ठ महिला सभासद यांच्या हस्ते करावे असे सांगितल्याने श्री देशमुख यांनी लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन तशी निवड करण्यास सांगितले.

त्यानुसार योगायोग जुळून आला की जिल्हा बँकेचे एकेकाळी सांगवी तालुका यावल येथील त्र्यंबक श्यामजी चौधरी हे जिल्हा बँकेचे 45 वर्ष संचालक होते त्यानंतर लीलाधर त्र्यंबक चौधरी हे जवळपास जिल्हा बँकेचे 30 ते 35 वर्षे संचालक होते व त्यानंतर प्रशांत लीलाधर चौधरी हे देखील जिल्हा बँकेचे दहा वर्षे संचालक होते जवळपास एकाच कुटुंबात 80 ते 90 वर्ष संचालक होण्याचा मान हा जळगाव जिल्ह्यातील सांगवी येथील चौधरी कुटुंबाला मिळालेला आहे आणि हा योगायोग समजून त्यांच्याच परिवारातील महिला सभासद श्रीमती पुष्पाताई लीलाधर चौधरी वय वर्ष 80 यांना झेंडावंदन करण्याचा मान जिल्हा बँकेच्या वतीने देण्यात आला याबद्दल सभासदांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये कौतुक केले जात होते जिल्हा बँकेचे चेअरमन भाऊसाहेब संजयजी पवार व कार्यकारी संचालक जितेंद्रजी देशमुख यांच्या हस्ते श्रीमती पुष्पाताई चौधरी यांना शाल श्रीफळ व साडी चोळी देऊन त्यांचा यथोचित मानसन्मान करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com