आत्मनिर्भर योजनेचा गाजा-वाजा, फक्त देखाव्यासाठीच का ?

उत्तर महाराष्ट्रात सर्वाधीक नोंदणी चाळीसगावात, आत्मनिर्भर योजनेपासून लाभार्थी वंचित
आत्मनिर्भर योजनेचा गाजा-वाजा, फक्त देखाव्यासाठीच का ?

चाळीसगाव | प्रतिनिधी Chalisgaon

पथविक्रेत्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी आत्मनिर्भर निधीची घोषणा केल्याने या योजनेच्या लाभासाठी उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक चाळीसगाव शहरातुन ५०० हुन अधिक लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली, मात्र यातील एकाही लाभार्थ्याला आता पर्यंत कर्ज उपलब्ध झाले नाही. त्यामुळे या योजनेचा मुळ हेतू बाजूला राहिला, परंतू योजनेची सोशल मिडियावर व इतर माध्यामातून जगजागृती करुन स्वता;ची प्रसिद्ध करुन घेण्यात आल्याची चर्चा चाळीसगावात रंगल्या आहेत. त्यामुळे आत्मनिर्भर योजनेचा गाजा-वाजा हा फक्त देखाव्यासाठीच का ? असा प्रश्‍न उपस्थित केला जावू लागल आहे.

लॉकडाऊनमध्ये पथविक्रेत्यांना आपला व्यवसाय बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे त्यांच्याजवळ खेळते भांडवल नसल्याने त्यांचे व्यवसाय अडचणीत आलेले आहेत. अर्थव्यवस्थेच्या महत्वाचा घटक असलेल्या पथविक्रेत्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी आत्मनिर्भर निधीची घोषणा केल्याने या योजनेतून पथविक्रेते, फेरीवाले, हातगाडी विक्रेते,भाज्या, फळे, तयार खाद्य पदार्थ, चहा, भजी पाव, अंडी, कापड, वस्त्र, चप्पल, कारागीर द्वारा उत्पादित वस्तू विक्रेता पुस्तक स्टेशनरी तसेच केश कर्तनालय, चर्मकार, पान दुकाने, कपडे धुलाई व लॉड्री दुकानदार असे लहान मोठे बारा बलुतेदार व्यावसायिकांना आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळते भांडवलाचा पुरवठा तातडीने करण्यासाठी १० हजार रुपयापर्यंतचे खेळते भांडवल देण्याचा निर्णय घेतला. या योजनेची घोषणा झाल्यापासून चाळीसगावात सोशल मिडीयावर योजनेचा लाभ घेण्यासाठी जगजागृती केली जात होती. तसेच मागील महिन्यात शिवाजी घाट परिसरात या योजनेसाठी जनजागृती अभियानाचा खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते शुभारंभ देखील करण्यात आला होता.

चाळीसगाव शहरात आत्मनिर्भर योजनेचा प्रचार-प्रसार देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने, आतापर्यंत मात्र उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक चाळीसगाव शहरातुन ५०० हुन अधिक लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी झाली आहे, मात्र यातील एकाही लाभार्थ्याला कर्ज न मिळाल्याची बाब नुकतीच आमदार मंगेश चव्हाण यांनी शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत व खाजगी बँकांच्या व्यवस्थापकांची व नगरपालिका अधिकार्‍यांची घेतलेल्या बैठकीत समोर आली आहे. त्यात योजना बारगळण्यात बँक व नगरपालिका यांच्यातील समन्वयाच्या अभाव, पथविक्रेत्यांना असलेली योजनेची अपूर्ण माहिती अशी विविध कारणे समोर आली. या योजनाच जनजागृती करणार्‍यांनी प्रत्यक्षात योजनेचा लाभ लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कुठल्याही प्रकारची आतापर्यंत मदत न केल्याचे यातून उघड होत आहे. त्यामुळे चाळीसगावात फक्त योजनाच्या नावाखाली मोठ-मोठाले शिबीर घेतली जातात, प्रत्यक्षात मात्र लाभार्थी वंचित राहत असल्याचे बोलले जात आहे. या गंभीर प्रकारामुळे शसनाची व भोळ्या-भाभट्या जनतेची एकप्रकारे फसवणूक केली जात असल्याचे चित्र दिसत आहे.

चाळीसगावात काही राजकिय लोकांना शासकिय योजना ह्या फक्त स्वता;ची प्रसिध्दीसाठीच पाहिजे असतात, प्रत्येक्षात तालुक्यातील मतदारांना त्यांचा लाभ मिळो अथवा ना मिळो यांच्याशी काहीएक देणघेणे नसते, मागे देखील तालुक्यातील शासकिय योजनाची जत्रा भरवली गेली, परंतू प्रत्यक्षात किती लोकांना लाभ मिळला हा संशोधनाचा विषय आहे. फक्त प्रसिध्दी सोशल मिडियावर फोटो, बॅनर असे उद्योग नित्याचेच झाले असून यातून जनतेची फसवणूक मात्र केली जात आहे.

प्रा.गौतम निकम, जनआदोलन विभाग खान्देश

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com