बचत गटांनी ब्रँड तयार करावा!

बचत गटांनी ब्रँड तयार करावा!

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

बचत गटातील (Self-help groups) महिलांनी वस्तुंच्या उत्पादनाची (production) ओळख होवून बाजारपेठ मिळण्यासाठी स्वतःचा ब्रँड (create brands) तयार करावा असा सल्ला महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashree Mahajan) यांनी दिला.

दिनदयाल अंत्योदय(Dindayal Antyodaya Yojana) योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका (National Civil Livelihood) अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेनुसार बिज भांडवल वाटप कार्यक्रमाचे आयोजन महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, अतिरीक्त आयुक्त श्याम गोसावी, नवजीवन सुपर शॉपीचे संचालक अनिल कांकरिया, विजया देवरे, अनिता जगताप, रजनी सोनवणे, आशा सपकाळे, सचिन धुमाळ, गायत्री पाटील उपस्थित होते.

यावेळी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी बचत गटाच्या (Self-help groups) माध्यमातून महिलांनी स्वावलंबी व्हावे, असे मत व्यक्त केले. बचत गटामधून होणार्‍या व्यवसायामध्ये सातत्य व गुणवत्ता टिकून असली पाहीजे. तसेच आपण उत्पादीत केलेल्या वस्तू ग्राहक वर्गास वाजवी किंमतीत कसे उपलब्ध करुन देता येईल याकडे आपला कल असला पाहीजे असे अनिल कांकरिया यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविक गायत्री पाटील यांनी केले. सुत्रसंचलन आशा चौधरी यांनी तर आभार शालिग्राम लहासे यांनी मानले. यशस्वीतेसाठी अमोल भालेराव, अब्बास तडवी, राहूल बडगुजर, कविता जाधव, शितल कंखरे, राजेश गडकर, नितीन जोशी, सुनंदा फडके, सुरेखा पाटील, भाऊलाल ठाकरे, हिरामण सपकाळे यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com