स्नेहल वारके ची प्रादेशिक परिवहन अधिकारी पदी निवड

स्नेहल वारके ची प्रादेशिक परिवहन अधिकारी पदी निवड

न्हावी Nhavi ता. यावल

येथील भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची (Bharat Vidyalaya and Kanishtha Mahavidyalaya) माजी विद्यार्थिनी (Alumni) पूर्वा श्रमिची स्नेहल विजय वारके (Snehal Vijay Warke) ( सौ.स्नेहल ऋषीं पाटील, बहाळ, ता. चाळीसगाव , जि. जळगांव. ) हिने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (Regional Transport Officer) म्हणून (आर टी ओ ) नुकतीच एम पी एस सी परीक्षा (MPSC exam) उत्तीर्ण केली आहे. त्यानिमित्ताने तिने जिल्ह्याच्या व भारत विद्यालयाच्या शिर पेचात मनाचा तुरा रोवला आहे.

तिच्या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष (President of Shikshan Prasarak Mandal) शरद महाजन (Sharad Mahajan) ,उपाध्यक्ष अनिल लढे,चेअरमन पी एच महाजन , सेक्रेटरी हर्षद महाजन, संचालक अविनाश फिरके, सरपंच सौ भारती चौधरी ,उपसरपंच उमेश बेंडाळे, दूध उत्पादक सहकारी संस्थेचे चेअरमन नितीन चौधरी, व्हाईस चेअरमन पराग वाघुळदे,अक्षय पतसंस्थेचे चेअरमन सुनील फिरके,व्हाईस चेअरमन सौ.स्वीटी बेंडाळे, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रवीण वारके, व्हा चेअरमन सुधाकर चौधरी,प्रा. डीआर पाचपांडे, प्राचार्य प्रवीण फालक, ए सी वारके, डॉ.तुषार वारके,विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,ग्रामस्थांसह तिच्यावर जिल्हाभरातून अभिनंदनाचा (Congratulations) वर्षाव होत आहे.

भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक व्ही बी वारके यांची स्नेहल ही कन्या होय.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com