खान्देशच्या साहित्यिकाचा राज्यस्तरावर गौरव

सुवर्ण महोत्सवी ‘किशोर गोष्टीत’ धरणगावच्या प्रा.बी.एन.चौधरी यांची निवड
खान्देशच्या साहित्यिकाचा राज्यस्तरावर गौरव

जळगाव । jalgaon

धरणगाव (dharangaon) येथील पी.आर.हायस्कूलचे (P.R. High School) निवृत्त मुख्याध्यापक तथा खान्देशातील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.बी.एन.चौधरी (b.n.Chaudhary) यांची किशोर गोष्टी या उपक्रमाअंतर्गत कथाकथनासाठी निवड झाली आहे. शासनाच्या ई-बालभारती या वाहिनीवर, त्यांनी सांगितलेली राक्षस बाटलीत बंद करा ही कथा प्रसारीत झाली असून, अल्पावधीत तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे (Government of Maharashtra) प्रकाशित होणारे किशोर मासिक आपला सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने किशोर गोष्टी हा उपक्रम वर्षभर राबविण्यात येत आहे. गेल्या 50 वर्षांत किशोरमधून प्रकाशित झालेल्या 50 कथांची निवड करुन, त्या मूळ कथा लेखकांकडून अथवा वाचक स्वर देवून ई-बालभारतीवरुन प्रसारीत करण्यात येत आहेत. खान्देशातून प्रा.बी.एन.चौधरी यांची एकमेव निवड झाली असून, ही खान्देशसाठी अभिमानाची बाब आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या या उपक्रमाला, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मार्गदर्शन केले आहे. या उपक्रमाची संकल्पना बालभारतीचे संचालक दिनकर पाटील यांची असून, किशोरचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांनी संयोजन केले आहे. तंत्रसहाय्यक म्हणून योगेश लिमये यांनी बाजू सांभाळली आहे. किशोरच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त यातील सूवर्ण स्मृती जतन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे केंद्रे म्हणाले. प्रा. चौधरी हे गेल्या वीस वर्षांपासून किशोरमध्ये लेखन करत आहेत.

महाराष्ट्रातील हजारो ग्रामीण तथा शहरी शाळांपर्यंत बालभारती आणि किशोर पोहचते. लाखो शिक्षक आणि विद्यार्थी याचा लाभ घेतात. त्या सर्वांपर्यंत आपली कथा आपल्याच आवाजात प्रत्यक्ष सादर करुन पोहचवणे, हा सुखद अनुभव असल्याचे प्रा.बी.एन.चौधरी यांनी सांगितले. बालभारती आणि किशोरशी असलेला ऋणानुबंध, या उपक्रमाने अधिक दृढ झाला, असे ते म्हणाले. सुवर्ण महोत्सवानिमित्त झालेले हे 50 कथांचं रेकॉर्डींग म्हणजे भविष्यकाळासाठी एक दस्तऐवज झाला आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभात आहे. प्रा. चौधरी यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com