
जळगाव jalgaon
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी (Republic Day) मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणा-या राज्यस्तरीय रासेयो स्वयंसेवक संचलनकरीता ( RASEO Volunteer Movement) (परेड) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (North Maharashtra University)पाच विद्यार्थ्यांची (students) निवड झाली आहे.
निवड झालेल्या या विद्यार्थ्यांना मुंबई येथे दिनांक १७ जानेवारी पासून आयोजित शिबिरात सराव दिला जाणार आहे.
निवड झालेल्यांमध्ये साक्षी पाटील (पर्यावरणशास्त्र प्रशाळा, विद्यापीठ), अश्वीनी वाघ ( जी टी पी महाविद्यालय, नंदुरबार), ऋषीकेश पाटील (डॉ. पी. आर घोगरे महाविद्यालय, धुळे), अक्षय महाजन (सामाजिकशास्त्र प्रशाळा, विद्यापीठ), निलेश कोळी ( जे डी एम व्ही पी एस महाविद्यालय, जळगाव) या पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या निवडीबद्दल कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, रासेयो संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी अभिनंदन केले आहे.