
जळगाव - jalgaon
कोरोनाच्या (corona) दुसर्या लाटेत जिल्हा सामान्य रुग्णालयात (Ventilator) व्हेंटिलेटर खरेदी प्रकरणात गैरव्यवहाराचा आरोप जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.नागोराव चव्हाण (Dr. Nagarao Chavan) यांच्यावर करण्यात आला होता.
याप्रकरणाची चौकशी करुन त्याचा अहवाल जिल्हाधिकार्यांनी राज्य शासनाकडे पाठविला होता. तसेच त्यांच्याबाबत तक्रारदारांनी शासनाकडे तक्रारी देखील केल्या होत्या. या सर्व बाबींची दखल घेत शासनाने प्रशासकीय कारण दाखवित डॉ. चव्हाण यांची उचलबांगडी केली आहे. तसेच त्यांच्या जागी डॉ. किरण पाटील यांची वर्णी लागली आहे.