डांभुर्णी गावच्या शिरेपेचात मानाचा तुरा!

भूषण चौधरी यांची उपायुक्त नगर रचनाकार (वर्ग-१) पदी निवड
डांभुर्णी गावच्या शिरेपेचात मानाचा तुरा!

यावल - प्रतिनिधी yaval

स्वयंदीप प्रतिष्ठानचे मार्गदर्शक तसेच प्रगतिशील शेतकरी रामचंद्र विष्णू चौधरी यांचे सुपुत्र भूषण रामचंद्र चौधरी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उपायुक्त नगर रचनाकार (वर्ग-1) महाराष्ट्र शासन पदी यशस्वी निवड झाली.

भूषण चौधरी यांचे माध्यमिक शिक्षण भगीरथ विद्यालय जळगाव त्यानंतर जुनिअर कॉलेज मुलजी जेठा महाविद्यालय जळगाव आणि 2001 साली (BE-Civil) विशेष प्राविण्यासह पूर्ण केलं आणि 2003 साली (ME-Town and Country planning) हे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे (COEP) येथून विशेष प्राविण्यासह पदविका पूर्ण केली.

2008 मध्ये भूषण चौधरी यांनी व त्यांच्या सुविद्य पत्नी या दोघांची एकाच दिवशी महाराष्ट्र शासनाच्या सिडको (CIDCO) विभागात उपनियोजनकार पदी निवड झाली.

नवी मुंबई पक्रल्प, नैना, विकास योजना, विकास आराखडा आणि नगररचना योजना इत्यादीं प्रकल्पांचा पंधरा वर्षाचा दांडगा अनुभव श्री.चौधरी यांना आहे. सध्या सिडकोमध्ये सहयोगी नियोजनकार तथा अतिरिक्त नगरचना अधिकारी या पदाचा कार्यभार सांभाळत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com