
रावेर-प्रतिनिधी raver
अश्वमेघ क्रीडा स्पर्धेसाठी (Ashwamegh sports competition) व्ही.एस.नाईक महाविद्यालयातील (VS Naik College) सात खेळाडूंची (player) निवड झाली आहे. औरंगाबाद (aurangabad) येथे दि.3 ते 7 डिसेंबर या दरम्यान अश्वमेध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यात रसिका माळी ही विद्यार्थिनी ट्रिपल जंप,हाय जंप.भागवत महाजन 200 मीटर, 4 बाय100 रिले.सारंग बिरबन 4 बाय 400 रिले, सुनील कोळी 4 बाय 400 रिले,आदित्य महाजन -ट्रिपल जंप, पूजा लोहार -कबड्डी,श्रुती महाजन -कबड्डी यासाठी निवड झाली आहे.
या निवड झालेल्या खेळाडूंना संस्थेचे चेअरमन हेमंत नाईक, सर्व संचालक मंडळ,विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.दिनेश पाटील, डॉ.अनिल पाटील सिनेट सदस्य, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.उमेश पाटील, क्रीडा समन्वयक प्रा एस यु पाटील, उपप्राचार्य डॉ.व्ही.बी. सुर्यवंशी, नॅक समन्वयक डॉ.एस.आर.चौधरी, प्रा.एस.डी.धापसे, डॉ.जी. आर.ढेंबरे,प्रा.व्ही.डी. पाटील, प्रा.एम.एस. पाटील, डॉ.जे.एम.पाटील, प्रा.डॉ.ए.एन.सोनार, प्रा.डॉ. एल.सी.नेमाडे, प्रा.एम.एम.पाटील, प्रा.एम. एस. पाटील, डॉ.एस.जी. चिंचोरे, प्रा.पी.व्ही. पाटील, प्रा.नरेंद्र घुले, प्रा.एस.बी.धनले, डॉ.संतोष गव्हाड, डॉ.बी.जी.मुख्यद्ल, प्रा.चतुर गाढे, प्रा.एम.डी.तायडे यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या.