दिपनगर परिसराची सुरक्षा वार्‍यावर

सुरक्षा अधिकारी सक्षम नसल्याने चोरीच्या प्रमाणात वाढ
दिपनगर परिसराची सुरक्षा वार्‍यावर

फेकरी,Fekri ता.भुसावळ | वार्ताहर

भुसावळ ((Bhusawal) औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर (Thermal Power Station Deepnagar) मधील २१० मेगावॅट व ५००/२ मेगावॅट प्रकल्पाची आणि वसाहतीची सुरक्षा (Security) करण्याची जबाबदारी ज्या मुख्य सुरक्षा अधिकार्‍यावर (Chief Security Officer) सोपवली आहे ते शारीरिक दृष्टीने अपंगत्व असल्यामुळे त्यांना ऑफिसमध्ये आणण्यासाठी व घरी नेण्यासाठी स्पेशल मेस्को सेक्युरिटीचे कर्मचारी (Employees of Mesco Security) नेमले असून हे कर्मचारी रोज दिवसभर त्यांना गाडीतून उचलून ऑफिसमध्ये खुर्चीवर बसवतात आणि घरी नेण्यासाठी परत खुर्ची उचलून गाडीत बसवतात.

ज्यांना दिपनगर प्रकल्पाची व परिसराची सुरक्षा करायची ते सुरक्षा कर्मचारी (Security personnel) अधिकार्‍याची सेवा करत आहेत. सेवा अधिकार्‍याची आणि पगार मात्र शासनाचा! मुख्य सुरक्षा अधिकारी शारीरिक दृष्ट्या अपंगत्व असल्यामुळे त्यांना नेहमी आधाराची गरज असते. हे स्वतःची सुरक्षा करू शकत नाही तर एवढ्या मोठ्या प्रकल्पाची व दीपनगर वसाहतीची सुरक्षा कशी करतील? हा एक मोठा प्रश्न आहे. यांच्या हाताखालील कनिष्ठ सुरक्षा अधिकारी व मेस्को साईट इन्चार्ज यांच्या कमजोरीचा फायदा घेत हलगर्जीपणा करतात. त्यामुळे दीपनगर परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाण (Theft rate) वाढले आहे.

५००/२ मेगावॅट सीएचपी बोगदा टिपलर या पोस्टवरून नदीकडून भिंतीला मोठा भगदाड चोरांनी पाडले असून तेथून चोर आत शिरतात व आतील प्रकल्पाचा मौल्यवान सामान बोगद्यातून बाहेर चोरुन नेतात यामुळे दिपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे (Deepanagar Thermal Power Station) लाखोंचे नुकसान होत असून वसाहती ठिकाणी सुद्धा चोरीचे प्रमाण वाढले आहे.

दीपनगर गँस गोडावून जवळ केबल वायर चोरीला (Cable wire) गेली असता चोरांकडून चिरीमिरी घेऊन केस रफादफा करुन शिक्षा संन्यास्याला दिली, असा मनमानी कारभार सुरू असून या चोर्‍यावर आळा बसावा म्हणून मुख्य अभियंता (Chief Engineer) यांनी बोर्डाचे सुरक्षा अधिकारी, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी व मेस्कोचे साईड इन्चार्ज व कर्मचारी यांची वेळोवेळी शारीरिक तपासणी करावी आणि ज्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी नियमांचे उल्लंघन करून मनमानी केली, त्यांच्यावर दंडात्मक कायदेशीर कारवाई करावी, अशी परिसरातून मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.