माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांचा लेटर बॉम्ब : शिक्षण सेवक भरती सापडली वांध्यात

माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांचा लेटर बॉम्ब : 
शिक्षण सेवक भरती सापडली वांध्यात
USER

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाकडून (District Maratha Vidya Prasarak Mandal) दोन दिवसापुर्वीच वृत्तपत्रात जाहिरात (Advertising) देवून विविध 60 शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया (Teacher recruitment process) सुरू केली होती. मात्र, माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांच्या लेटर बॉम्बमुळे (letter bomb) ही शिक्षण सेवक भरती (Education Servant Recruitment)आता वांध्यात (Vandhya) सापडली आहे. ही भरती रद्द करा,अन्यथा रिक्तपदे व्यपगत (Vacancies Expired) करण्यात येतील, असा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी (Secondary Education Officers) डॉ.नितीन बच्छाव यांनी दिला असून तसे पत्र संस्थेचे मानद सचिव (Honorary Secretary of the Institute) यांना जारी केले आहे.

दोन दिवसापूर्वीच जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह. समाज मर्यादीत जळगाव संचालित विविध माध्यमिक शाळेतील रिक्त असलेल्या पदावर शिक्षण सेवक भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालयाच्या 23 जून 2017 च्या निर्णंयानुसार शिक्षक भरती पवित्र प्रणाली मार्फत करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, ही बाब माहित असतांना देखील आपण शिक्षण सेवक भरतीची प्रक्रिया वृत्तपत्रात जाहिरात देवून सुरू केली आहे.

ती तात्काळ रद्द करा, असे पत्र माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.नितीन बच्छाव यांनी दि.14 रोजी संस्थेचे मानद सचिव यांना पाठविले आहे. तसेच शिक्षण सेवक भरतीची प्रक्रिया रद्द न केल्यास ही पदी व्यपगत करण्याची कार्यवाही करण्याचा इशारा त्यांनी पत्राव्दारे दिला आहे. त्यामुळे संस्थेच्या 60 शिक्षण सेवकांच्या भरतीची प्रक्रिया आता वांध्यात सापडली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com