अतिक्रमण पथकाकडून चार दुकाने सील

भाजीपाला, फ्रूटच्या ६ हातगाड्यांसह इतर साहित्य केले जप्त; अटीशर्तींचे उल्लंघन
अतिक्रमण पथकाकडून चार दुकाने सील

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

येथील फुले मार्केट, कोर्ट चौक, नेहरु पुतळा, बळीराम पेठ, सुभाष चौकात शनिवारी मनपाच्या अतिक्रमण पथकाने मोठी कारवाई करीत सोशल डिस्टन्स न पाळल्याने तसेच नियमांचे उल्लंघन केल्याने...

४ दुकाने सील तर विविध परिसरातून ६ हातगाड्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही कारवाई करण्यात आली.

अटीशर्तींचे उल्लंघन

फुले मार्केट येथील 3 व कोर्ट चौकातील 1 दुकान असे एकूण 4 दुकाने सील करण्यात आली तसेच फुले मार्केट परिसर, चौबे शाळा चौक, नेहरु चौक, ओक मंगल कार्यालय, सुभाष चौक परिसरातून जवळपास 6 हातगाड्या, तराजुकाटे वजनमापे, बाजार साहित्य आदी जप्त करण्यात आले.

मनपा उपायुक्त संतोष वाहुळे हे कारवाई प्रसंगी उपस्थीत होते. यावेळी पोलिस बंदोबस्तही होता. यावेळी काही ठिकाणी किरकोळ तर काही ठिकाणी मोठ्या स्वरुपात वादावादही झाली. पोलिस बंदोबस्त असल्याने वाद निवळण्यात आला. शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर 4 दुकाने सील करीत ही कारवाई फत्ते करण्यात आली. भाजीपाला तसेच फळेसह हातगाड्या जप्त करण्यात आल्या.

नेहरु चौक, चौबे शाळा चौक, सुभाष चौक, ओक मंगल कार्यालय परिसर येथून या हातगाड्या जप्त करण्यात आल्या. दिवसभर अतिक्रमण पथकाने शहरातील विविध भागात ही कारवाई केली. कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असल्याने मनपा प्रशासनाने कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.

विना मास्क नागरिक, दुकानदारांसह सोशल डिस्टन्स न पाळणारे दुकानदारांवरही कारवाई करण्यात आली. सार्वजनिक जागेवर थुंकणार्‍यांवरही कारवाई करण्यात येत आहे. शनिवारच्या कारवाईने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी होत होती. या कारवाईत अतिक्रमण पथकाचे नाना कोळी, संजय ठाकूर, सुनिल पवार, राजु वाघ, मुकेश सोनवणे, किशोर सोनवणे, वैभव धर्माधिकारी, बंटी कोळी, सतीश ठाकरे, बापू पाटील आदींचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com