शाळांना ठेवावी लागणार विद्यार्थी वाहतूक करणार्‍यांची माहिती

वाहतूक शाखेच्या बैठकीत निर्णय; वाहनचालकांनी मांडल्या समस्यांच्या तक्रारी
शाळांना ठेवावी लागणार विद्यार्थी वाहतूक करणार्‍यांची माहिती

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शाळेतील विद्यार्थी वाहतुक सुरक्षित (Safe school student transport) राहण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून (security perspective) प्रत्येक शाळेला संबंधित वाहनचालकांची माहिती (School related driver information) ठेवावी लागणार असल्याचा निर्णय शालेय विद्यार्थी वाहतुक करणार्‍या चालक-मालक व पोलिस वाहतुक विभागाच्या (Driver-Owner and Police Transport Department) बैठकीत घेण्यात आला.

शहर वाहतूक नियंत्रण शाखा च्या वतीने शनिवारी शहर वाहतूक नियंत्रण शाखेत पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या उपस्थितीत शहरातील शालेय विद्यार्थी वाहतूक संघटना, युनियन व चालक मालक बांधव यांची बैठक पार पडली. जळगाव पोलिस दल, शहर वाहतूक नियंत्रण शाखा व शालेय विद्यार्थी वाहतूक चालक मालक यांच्यात समन्वय राहावा यासाठी या बैठकीचे आयोजन नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे व शहर वाहतूक नियंत्रण शाखा पोलिस कर्मचारी फकिरा रंधे यांनी केले होेते. या बैठकीत शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे यांनी शालेय विद्यार्थी वाहतूक चालक मालक यांना शासनाच्या नियमानुसार विद्यार्थी वाहतूक करावी, विद्यार्थी वाहतूकीमुळे विद्यार्थ्यांची कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी. यासह विनापरवाना विद्यार्थी वाहतुक करणार्‍यांवर कारवाई करणार असल्याचा सूचना दिल्या. यावेळी प्रल्हाद सोनवणे यांनी शालेय विद्यार्थी वाहतूक चालक मालक यांना काही शाळा, स्कूल विद्यार्थी वाहतूकीचे लेटर देण्यास नकार देत आहेत तरी शाळांना सुचना देऊन विद्यार्थी वाहतूकीचे लेटर देण्यात यावे अशी मागणी केली.

यावर पोनि. कानडे यांनी पोलिस दलाच्या माध्यमातून संबंधित शाळांना वाहनचालकांची अद्यावत माहिती व विद्यार्थी वाहतुक सुरळीत राहण्यासाठी लेटर देण्यासंदर्भात पत्रक पाठविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत प्रल्हाद सोनवणे, दिलीप सपकाळे प्रमोद वाणी, भानुदास गायकवाड, संजय पाटील, विनोद कुमावत, भरत वाघ देविदास भडंगर , बाजीगर पाटील, जब्बार खान , नाना भोई , विजय अहिरराव, नंदू जोशी, संदिप वाणी , दिलीप वाघ, ताराचंद पाटील, प्रदीप बयास , सुनील वाणी, पद्माकर पाटील,अक्षय वाणी राजु कोळी, अशोक चौधरी, किसन पाटील, योगेश कोळी, सुनील नन्नवरे, यांच्यासह शहरातील सर्वच शालेय विद्यार्थी वाहतूक संघटना युनियन व शालेय विद्यार्थी वाहतूक चालक मालक उपस्थित होते.

नियमानुसार वाहतुक करण्यास तयार

बैठकीत दिलीप सपकाळे यांनी विद्यार्थी वाहतूक चालक मालकांवर न सुचना देता कायदेशीर कारवाई करू नय.े आमचा नियमानुसार विद्यार्थी वाहतूक करण्यास तयार आहोत असे आश्वासन दिले. तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देखील पोलिस दलाकडून देण्यात आल्या.

विद्यार्थी संख्येसह चालकाची पत्रकावर माहिती

शहर वाहतूक नियंत्रण शाखा पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे, प्रल्हाद सोनवणे, दिलीप सपकाळे यांच्या हस्तेवाहन चालक मालक व शाळेची माहितीचे पत्रक (स्टिकर) लावून शुभारंभ करण्यात आला. तसेच हे स्टिकर शहरातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी वाहतुक करणार्‍या वाहनांवर लावण्यात येणार आहे. या पत्रकावर चालकासह वाहनातील विद्यार्थी संख्या याबाबत संपुर्ण माहिती राहणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com