सावित्रीच्या लेकींनी सावित्रीबाईंचे विचार अंगीकारावे : प्रा. वंदना पाटील

सावित्रीच्या लेकींनी सावित्रीबाईंचे विचार अंगीकारावे : प्रा. वंदना पाटील

नूतन मराठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात सावित्रीबाई ते राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेस प्रारंभ

जळगाव jalgaon

सावित्रीबाई फुलेच्या (Savitribai Phule) लेकींनी सावित्रीबाईंचे विचार (Thoughts) अंगिकारले तर आजची पिढी जबाबदार होईल. त्यासोबतच महिलांच्या संरक्षणासाठी (protection of women) पुढे येईल. असे मत प्रा. वंदना पाटील (Prof. Vandana Patil) यांनी व्यक्त केले.

Nutan Martha college logo
Nutan Martha college logo

नूतन मराठा महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ते राजमाता जिजाऊ जयंती म्हणजेच 3 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान कर्तृत्ववान महिलांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांची यशोगाथा सांगणार्‍या व्याख्यानमालेस सुरुवात झाली. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रा.वंदना पाटील यांनी गुंफले.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सलगपणे दहा दिवस चालणार्‍या व्याख्यामालेला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख अध्यक्ष म्हणून लाभले होते त्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व्याख्यानमालेला सुरुवात झाली.

सावित्रीबाईंचे विचार, संघर्ष आणि त्यांच्या संघर्षपूर्ण जीवनातून स्त्री शिक्षणाची गंगोत्री आपल्या पर्यंत कशी पोहचली यावर सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुषेत प्रा वंदना पाटील यांनी व्याख्यानमालेच़ं पहिलं पुष्प वाहिलं.

व्याख्यानमालेचं आयोजन आणि त्यामागील भुमिका प्रा इंदिरा पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद केली.

या व्याख्यानमालेत 3 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत राजमाता जिजाऊ,महाराणी येसूबाई, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, ताराबाई शिंदे,पंडीता रमाबाई, आनंदीबाई जोशी, बहिणाबाई चौधरी, ताराबाई मोडक, रमाबाई आंबेडकर, इंदिरा गांधी,कमला भसीन आणि सिंधूताई सपकाळ अशा कर्तृत्ववान महिलांच्या जीवनकार्यावर आणि यशोगाथेवर प्रकाश टाकण्यात येणार असून, राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीने या व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे

याच कार्यक्रमाचा भाग म्हणून शहरातील पाच कर्तबगार महिलांचा सन्मान महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला,यात जळगाव महापालिका महापौर सौ जयश्री सुनील महाजन, सरकारी वकील सौ चारुलता बोरसे, संगीत विशारद सौ विशाखा देशमुख, साहित्यीका सौ पुष्पा साळवे,उद्यमी महिला सौ किरण वनकर आदी मान्यवर कर्तबगार महिलांचा समावेश होता.

या प्रसंगी महापौर सौ जयश्री महाजन यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून आपण महिलांनी देखील त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले, दरम्यान सर्वच सन्मानीत महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आपापले विचार मांडले

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य महोदयांनी या कतृत्ववान महिलांसारखे आजच्या स्त्रीयांनी स्वतला सिद्ध करत इतिहासात आपल्यासाठी देखील एक पान राखून ठेवावं असे आवाहन केले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या प्रा डॉ सुषमा तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा वैशाली सपकाळे यांनी केले,या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख, सर्व शाखेचे उपप्राचार्य, विभाग प्रमुख,प्राध्याप, शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहूसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com