ग्रामीण भागातील सौरभची क्रिकेटच्या खेळात दुबई भरारी ..!

गोल्ड कप क्रिकेट खेळासाठी निवड
ग्रामीण भागातील सौरभची क्रिकेटच्या खेळात दुबई भरारी ..!

शरद बोदडे
मुक्ताईनगर Muktainagar

तालुक्यातील सुकळी (Sukli) येथील सौरभ नवल कोळी (Saurabh Naval Koli) या विद्यार्थ्यांची क्रिकेट (Cricket) खेळात गोल्ड कप (Gold Cup) साठी आय.एन.सी.एन.द्वारा निवड (Selection) झाली असून तो दुबई (Dubai) येथे एक दिवसीय 5 क्रिकेट मॅचेस खेळणार असून तीन टी 20 मॅचेस खेळणार आहे.ग्रामीण भागातील सौरभने क्रिकेटच्या खेळात दुबई भरारी घेतल्याने त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील सौरभ नवल कोळी याचे जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण तर माध्यमिक शिक्षण , नवीन माध्यमिक विद्यालय सुकळी येथे झाले येथेच ड्रॉप रो बॉल या खेळात राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावर सिल्वर मेडल प्राप्त केले या खेळा अंतर्गतच नेपाळ येथे सुद्धा खेळण्यासाठी जाऊन आला.त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील पद्मश्री डॉ.व्ही.बी.कोलते इंजीनियरिंग कॉलेज येथे मेकॅनिकल इंजीनियरिंग करत असताना क्रिकेट खेळlत आवड असल्याने त्याच वेळेस आय.एन.सी.एल. (इंडियन नॅशनल कार्पोरेट लीग) ची माहिती मिळाली. त्या ठिकाणी निवड चाचणीत निवड झाली आणि अपेक्षित गुण पेक्षा जास्त गुण मिळाल्याने गोवा येथे होणाऱ्या डॉल्फिन टी 20 कम साठी निवड झाली.त्यात तीन मॅचेस मध्ये आठ विकेट घेतल्या तर 2 ओवर मेडन टाकल्या दोन बॅचेस घेतल्या आणि तीन रन-आऊट केले अशा पद्धतीने खेळ केल्याने या कामगिरीच्या बळावर सौरभ कोळी याची दुबई येथे होणाऱ्या गोल्ड कप क्रिकेट मॅच साठी मेडियम पेसर बोलर म्हणून निवड झाली आहे. या मॅच मध्ये चांगली कामगिरी केल्यास त्यानंतर सौरभ कोळी ची निवड आय एन सी एल डॉक्टर गोल्ड कप तसेच मेहेमान नवाजी ट्राफि आणि बेटी बचाव टी 20 ट्रॉफी करिता निवड होणार आहे. .

मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील नवीन माध्यमिक विद्यालयात लिपिक असलेल्या नवल कोळी यांचा सौरभ हा मुलगा आहे.सौरभ कोळीला भारतीय संघातर्फे खेळण्याची मनीषा आहे एक पर्यंत पोचण्यासाठी त्याला त्याच्या आई वडिलांचे प्रोत्साहन व मोलाचे असे योगदान मिळाले असून शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले तर नातेवाईकांचे सहकार्य लाभले आहे खेळामध्ये जिंकणे हारणे सुरू असते परंतु त्यातून अनुभव मिळतात व आपल्यातील कमतरता शोधून त्यावर मात केल्यास यशाचे शिखर गाठता येते असा संदेशही तरुणांना दिला आहे. खेळाच्या माध्यमातून , ग्रामीण भागातून थेट दुबई पर्यंत यशाची भरारी घेणाऱ्या सौरभला आपल्या देशाच्या संघात खेळण्याची इच्छा असून देशाचे नावलौकिक करण्याचाही त्याचा मानस आहे.

# विद्यालयातर्फे सौरभचा झाला होता सत्कार -- आय.एन.सी.एल.द्वारा निवड झाल्यानंतर गोवा येथे क्रिकेट खेळाडू चांगली कामगिरी केल्याबद्दल सौरभ कोळी व त्याचे कुटुंबीय यांचा भव्य सत्कार संस्थेचे सचिव डॉक्टर दिलीप पानपाटील व मुख्याध्यापक प्रदीप दाणे तसेच शिक्षक यांच्यातर्फे सुकळी येथील नवीन माध्यमिक विद्यालयात करण्यात आला होता

Related Stories

No stories found.