गावातील दारूबंदीसाठी कोळवदच्या महिलांचे सरपंचाना साकडे

गावातील दारूबंदीसाठी कोळवदच्या महिलांचे सरपंचाना साकडे

यावल Yaval ( प्रतिनिधी )

तालुक्यातील कोळवद ग्रामपंचायतीच्या (Kolavad Gram Panchayat) कार्यक्षेत्रात गेल्या अनेक दिवसापासून खुलेआम राजरोसपणे गावठी दारूची (Village liquor sales) सर्रास विक्री होत असुन , सहज मिळणाऱ्या या दारूमुळे मोलमजुरी करणारे नागरीकांपासुन तर अनेक तरुण हे व्यसनाधीन (Addicted) झाले असुन अनेकांचे संसार उद्धवस्थ झाले असुन , गावातील दारूबंदीसाठी महीलांनी पुढाकार (Women's initiative for alcohol ban) घेतला असुन , या संदर्भात महीलांनी सरपंच (Sarpanch) यांची भेट घेत त्यांनी गावातील गावठी दारू कायमची बंद करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे .

कोळवद ग्रामपंचायतचे (Kolavad Gram Panchayat) सरपंच याकुब तडवी यांच्याकडे तक्रार निवेदन दिले असुन या निवेदनावर परविन फकीरा तडवी , यशोदा सपकाळे , आशा रमजान तडवी , सोनाली रतनलाल सोळुंके यांच्यासह गावातील महीलांनी आपल्या स्वाक्षरी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , या गावात गावठी हातभट्टी दारूचे ११ ठीकाणी अड्डे असुन , गावातील सार्वजनिक ठीकाणी सहज मिळत असलेल्या दारूमुळे (Village liquor) तरूण पिढी ही फार मोठया प्रमाणावर व्यसनाधिन (Addicted) होत असुन , गावातील असंख्य पुरुष हे दारू पिऊन आपल्या कुटुंबाला व गल्लीतील लोकांना रात्री झोपु देत नाहीत .

या सर्व प्रकारामुळे अनेक ग्रामस्थांचे कुटुंब उध्वस्त झाले असुन , ही दारूडी मंडळी दारूच्या नशेत गल्लीतील लोकांना गालिच्छ भाषेत शिवीगाळ करून गोंधळ घालतात, दारूच्या व्यसनामुळे अनेक जणांचा व तरूणा मृत्युमुखी पडलेले आहे . दारू पिणारे हे दारूच्या नशेत आपल्या पत्नी व कुटुंबातीत मंडळीला मारहाण करतात .

तरी गावातील कुटुंबप्रमुख प्रथम नागरीक म्हणुन सरपंच यांनी आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी गावातील दारू तात्काळ बंद करावी अशी मागणी केली आहे . यावल शहरासह तालुक्यात सर्वत्र गावटी हातभट्टीची व अत्यंत घातक रसायनाद्वारे (dangerous chemicals) तय्यार करण्यात येणारी पन्नीची दारू खुलेआम विक्री जात असुन , या पन्नी दारूच्या आहारी गेल्याने अनेक तरूण हे मृत्युच्या वेटींग लिस्टवर असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. पन्नीची दारू व हातभट्टीची गावटी दारूच्या विक्रीवर तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department) व पोलीस प्रशासनाने (Police Administration) बंदी घालावी अशी ही मागणी होत आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com