सरदार जी.जी. हायस्कूलच्या सहा विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड

सरदार जी.जी. हायस्कूलच्या सहा विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय  स्केटिंग स्पर्धेसाठी निवड

रावेर|प्रतिनिधी raver

जळगाव येथील भगीरथ हायस्कूल येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत रावेर सरदार जी.जी हायस्कूलचे विद्यार्थी तर अंबिका स्केटिंग क्लबचे ६ खेळाडू यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

टेबल सोकर व रोलर स्केटिंग असोसिएशन जळगाव च्यावतीने भगीरथ हायस्कूलच्या प्रांगणात वयोगट ४ ते वयोगट वर्ष १६ च्या पुढील स्पर्धकांसाठी मिशन ऑलिंपिक स्केटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रावेर येथील अंबिका स्केटिंग क्लब मधील ९ वर्ष वयोगटात हिमांशु संतोष पाटील,११ वर्ष वयोगटात वेदांत विश्वनाथ पाटील, १५ वर्ष वयोगटात यश भास्कर महाजन या सर्वांनी रौप्य पदक पटकाविले. तर स्वयम अशोक सोनार व तेजस विजय चौधरी यांची व पदक विजेत्या स्पर्धकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण युवराज माळी व कुणाल महाजन यांचे मार्गदर्शन लाभले तर जे.के.पाटील,अजय महाजन ,प्रतीक खराले, यश सोनार यांचे सहकार्य लाभले.सर्व खेळाडूंना सरदार जी.जी हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरीष वाणी ,उपमुख्याध्यापक टि. बी.महाजन पर्यवेक्षक ई.जे.महाजन,एस.पी.पाटिल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com