चोरट्यांकडून पोलिसांना संक्रांतीचे वाण

चोरट्यांकडून पोलिसांना संक्रांतीचे वाण

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील जूना खेडी रोडवरील सुंदर नगरातील तीन बंद घरात चोरट्यांनी (thieves) डल्ला मारल्याची घटना रविवारी सकाळच्या सुमाराास उघडकीस आली. याठिकाणाहून चोरट्यांनी हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. एकाच वेळी तीन घरात चोरट्यांनी हातसफाई केल्याने चोरट्यांनी पोलिसांना (police) संक्रांतीचे वाणच (Sankranti varieties) दिले आहे. याप्रकरणी रात्री उशिरा शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील जूना खेडी रोड परिसरात संदीप रामलाल चौधरी हे वास्तव्यास असून ते हातमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. संदीप चौधरी हे पत्नी व मुलांना घेण्यासाठी धरणगाव येथे सासूरवाडीला गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते हीच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील गोदरेजच्या कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. तर संदीप चौधरी यांच्या पत्नीने बचत करुन साठविलेले पैसे चहापत्तीच्या डब्यात ठेवले होते. चोरट्यांनी ते पैसे देखील लांबविले. याच परिसरातील योगेश जाधव हे कुटुंबियांसह अकोला येथे गेले आहे. चोरट्यांनी दोन घरे फोडल्यानंतर आपला मोर्चा योगेश जाधव यांच्याघराकडे वळविला. याठिकाणी घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश कला. येथून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली असल्याची माहिती जाधव यांच्या पत्नीने फोनवरुन पोलिसांना दिली.

पोलीस उपअधीक्षकांची घटनास्थळी भेट

एकाचवेळी तीन घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस येताच पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, शनिपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण, गुन्हे शोध पथकातील परिस जाधव, राहुल पाटील, अनिल कांबळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचार्‍यांनी देखील घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. पोलसांना मिळालेल्या माहितीनूसार पोलसांकडून तपासचक्रे फिरविली जात आहे.

हातमोजे घालीत केली चोरी

चोरट्यांनी डल्ला मारलेल्या एका घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चोरटा घराच्या संरक्षक भिंतीवरुन आत शिरतांना तसेच चोरटयाने हातमोजे घातले असल्याचे देखील सीसीटीव्हीत कैद झाले आहे. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले आहेत.

कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न

संदीप चौधरींच्या घरात डल्ला मारल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घराशेजारी राहणारे पंकज सपकाळे यांच्या घराचे कुलूप तोडले. परंतु चोरट्यांनी घरात शिरता न आल्याने त्यांच्या घरात केवळ चोरीचा प्रयत्न फसला.

फॉरेन्सीच्या पथकाने घेतले हाताचे ठसे

मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी तीन बंद घरे फोडल्यानंतर घटनास्थळी श्वान व फॉरेन्सीकच्या पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. पथकाने घटनास्थळाहून चोरट्यांच्या हाताचे ठसे घेवले असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेेतला जात आहे.

चांदीचे दागिन्यांसह टॉमी सोडून चोरटे पसार

चोरट्यांनी चौधरी यांच्या घरातील सोन्याचे दागिन्यांवर डल्ला मारला. परंतु त्याच ठिकाणी ठेवलेल्या चांदीचे दागिन्यांना त्यांनी हातदेखील लावला नााही. तसेच घटनास्थळी चोरट्यांनी घराचे कडीकोयंडा व गज तोडण्यासाठी आणलेली टॉमी सोडून चोरटे पसार झाले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com