जिल्हा बँक अध्यक्षपदी संजय पवार तर उपाध्यक्षपदी अमोल पाटील

जिल्हा बँक अध्यक्षपदी संजय पवार तर उपाध्यक्षपदी अमोल पाटील

जळगाव - jalgaon

सन २०२१ च्या अखेरीस झालेल्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या पॅनलला बहुमत मिळाल्याने अध्यक्षपदी गुलाबराव देवकर तर उपाध्यक्षपदी शामकांत सोनवणे यांची वर्णी लागली. काही दिवसाअगोदर दोघांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागांसाठी आज निवड प्रक्रिया पार पडली.

आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत संजय पवार यांची अध्यक्षपदी तर अमोल पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. राष्ट्रवादी व काँग्रेस संचालकांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे गटनेते आ.एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात अध्यक्षपदासाठी रवींद्रभैय्या पाटील तर उपाध्यक्षपदासाठी अमोल चिमणराव पाटील यांचे नाव निश्चीत करण्यात आले.

आज ११ वाजेला जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बँकेत विशेष बैठक आयोजीत करण्यात आली. यात संजय पवार यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज घेताच उपस्थितांना धक्का बसला. त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने मतदान प्रक्रिया झाली. यात पवार यांनी बाजी मारली व उपाध्यक्षपदासाठी अमोल पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com