शिवापूर येथे ६६ हजारांचे चंदनाचे लाकूड पकडले

शिवापूर येथे ६६ हजारांचे चंदनाचे लाकूड पकडले

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी -

तालुक्यातील शिवापूर (Shivapur) येथे चंदनाच्या लाकडाची (sandal wood) चोरी (theft) करतांना तिघांना पकडले (three were caught) आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल ६६ हजार रुपयांचे चंदनाचे लाकूड जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला (Chalisgaon Rural Police Station) गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी तालुक्यातील शिवापूर येथे शिवापूर फाट्याजवळ सादिक नबीखॉ पठाण, आरीफ शीराज पठाण, फारुख नवाज पठाण सर्व रा. कुझखेडा ता. कन्नड जि. औरगांबाद यांच्या ताब्यातून पोलिसांना दिनांक २०/११/२०२२ रोजी ६६ हजार रुपये किमतीचे ओली चंदनाचे सुंगंधीत झाडांचा गाभा असलेली लाकडाची तुकडे अंदाजे २२ किलो वजनाचे मिळुन आले आहेत.

तसेच त्यांच्या ताब्यातील ३५,००० रुपये किमंतीतीचे लाल रंगाची हिरो होंडा कंपनीची अँचिवर मोटार सायकल (चक १९ Aन ८७७७ ) असा एकूण १,०१,००० रुपये किमतीची मुद्देमाल मिळुन आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ प्रविण संगेले हे करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com