पाटणादेवी जंगलात चंदन तस्कारांकडून वनमजुरांवर गोळीबार

चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला पाच जणांविरोधात गुन्हां दाखल
पाटणादेवी जंगलात चंदन तस्कारांकडून वनमजुरांवर गोळीबार

चाळीसगाव Chalsigaon प्रतिनिधी

तालुक्यातील पाटणादेवी जंगलात (Patna Devi forest) चंदनाची (Sandalwood) अवैद्यरित्या तोंड करण्यासाठी आलेल्या चंदन तस्कारांकडून (Sandalwood smugglers) वनरक्षक व वनमजुरांवर (forest laborers) गावठी कट्ट्यातून गोळीबार (firing) करण्यात आला आहे. हि घटना दि,१६ रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला पाच अज्ञात तस्कारांविरोधात गुन्हां (crime) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, गौताळा अभायअरण्यातील पाटणा परिक्षेत्रात दि,१६ रोजी वनरक्षक रहीम गंभीर तडवी यांच्यासह वनमजुर नागो किसन आगीवाले, नवशीराम गंगाराम मधे, अशोक गंगाराम आगीवाले, रंगनाथ सोमा आगीवाले, गोरख नामदेव राठोड, मेघनाथ कैलास चव्हाण हे गस्तीवर असताना, जंगलात त्यांना झाडे तोंडण्याचा आवाज आला. त्यांनी दबक्या पावलानी त्याठिकाणी जावून पाहिले असता, काही अनोखळी इसम चंदनाच्या झाडे तोडत असताना त्याना दिसले.

चंदन तस्कारांना कोणीतरी आल्याची चाहुल लागताच त्यांनी वनमजुरांच्या दिशेने कुर्‍हाड व करवत हवेत भिरकावून तेथून पळ काढला. परंतू वनरक्षक व वनमजुरांनी त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली असता, पुन्हां त्यानी दगड व कुर्‍हाड मारुन फेकत, त्यांच्याकडे असलेल्या गावठी कट्ट्यातून जिवेमारण्याच्या हेतून वनमजुरांच्या दिशेने गोळीबार केला. आणि वाढलेले गवत व सुरु असलेल्या जोरदार पावसाचा फायदा घेवून तेथून पळ काढला.

यात दगड लागल्यामुळे एक वनमजुर जखमी झाला आहे. वनरक्षक व वनमजुरांनी घटनास्थळावरुन चंदन प्रजातीची तुटलेली ६ झाडे, ५ लिटर गावठी दारु व इतर साहित्य मिळुन आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला रहीम गंभरी तडवी यांच्या फिर्यादीवरुन पाच अज्ञात तस्करांविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com