वाळू व्यवसायाला असलेला राजाश्रय सरकार शोधणार

महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखेपाटील यांची माहिती
आ. राधाकृष्ण विखे पाटील
आ. राधाकृष्ण विखे पाटील

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

वाळुच्या व्यवसायाला (Sand business) गुन्हेगारीचीही किनार (edge of crime) आहे. त्यामुळे वाळु व्यवसायाला नेमका राजाश्रय कुणाचा (Whose Rajashray?) आहे? याचा शोध सरकार (Search Government) घेणार असल्याची माहिती महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखेपाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhepatil) यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

जळगाव जिल्ह्यात वाळु व्यवसायाला मोठा रक्तरंजीत इतिहास राहिला आहे. तसेच मागील आठवड्यात वाळुच्याच विषयावरून खूनासारखी गंभीर घटना घडली. जिल्हा प्रशासनातर्फे वाळु चोरी रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी वाळुची चोरी थांबलेली नाही. तसेच निविदा प्रक्रिया राबवुनही गतवर्षी वाळु लिलावाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वाळु चोरीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे.

यासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखेपाटील यांना प्रश्न उपस्थित करण्यात आला. ना. विखेपाटील यांनी सांगितले की, वाळुच्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर राजाश्रय मिळत आहे.

हा राजाश्रय शोधण्याचे काम सरकार करणार आहे. तसेच आंध्रप्रदेश, गुजराथ, राजस्थान याठिकाणी वाळुचे धोरण कसे आहे? याची माहिती मागविण्यात आली असून संपुर्ण राज्यासाठी नव्याने सर्वंकष धोरण आखले जाणार असल्याचे ना. राधाकृष्ण विखेपाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com