
जळगाव jalgaon
शहरातील समता नगरात (Samtanagar) एका गटातील तरुणाने (Young) त्या परिसरातील तरुणीची छेड (Teasing the young lady) काढली. घटनेची माहिती मिळताच त्या गटाने छेड काढणाऱ्या तरुणाला बेदम चोप (Breathless chop) दिला. या मारहाणीत एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी (treatment) जिल्हा रुग्णालयात (District Hospital) दाखल करण्यात आले आहे.
यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे, उपनिरीक्षक गोपाल देशमुख यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आहे.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखलचे काम सुरू
रामानंद नगर पोलिसांनी काही संशयीताना ताब्यात घेतल्या नंतर याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सामाजिक कार्यकर्त्यानाकडून शांततेचे आव्हान
घटना घडल्यानंतर आरपीआयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी दोन्ही समुदायांची भेट घेत शांततेचे आवाहन केले. तसेच हा वाद दोन व्यक्तींमधील असून कोणीही कायदा व सुव्यवस्थेला प्रश्न निर्माण होणार नाही असे न करण्याचे आव्हान दोन्ही समुदायाला केले आहे.