महिनाभरातील उत्पादनापेक्षा तुपाची दुप्पट विक्री

अन्न, सुरक्षा अधिकार्‍यांच्या मदतीने होणारी पुढील चौकशी
महिनाभरातील उत्पादनापेक्षा तुपाची दुप्पट विक्री

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

जिल्हा दूध संघातून (District Milk Union) अनिल अग्रवाल व अकोला येथील चॉकलेट व्यावसायीक (chocolate businessman) रवी अग्रवाल यांना तुपाची विक्री (Sale of ghee) केली आहे. दूध संघात (milk union) महिनाभरात 1800 किलो बी ग्रेड तुपाचे उत्पादन झाले असून ते तुप रवी अग्रवाल यांना महिनाभरात खरेदी केले होते. मात्र त्याच महिन्यात अनिल अग्रवाल यांना देखील तितक्याच तुपाची खरेदी (Purchase of ghee) केले आहे. त्यामुळे हा आकडा 3500 हजार किलो पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

महिनाभरातील उत्पादनापेक्षा तुपाची दुप्पट विक्री
Breaking News : संतनगरीत राहुल गांधी म्हणाले : भाजपा देशात हिंसा पसरवित आहे !

जिल्हा दूध संघातील बी ग्रेड तुपाची कमी दरात विक्री केल्याप्रकरणी पोलिसांकडून अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दूध संघांचे कार्यकारी संचालक, प्रशासन प्रमुखांसह तुप खरेदी करणार्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, बुधवारी पथक तुप खरेदी करणारा अकोल्यातील चॉकलेट व्यावसायीक रवी अग्रवाल याला घेवून अकोला येथे गेले होते.

याठिकाणी त्यांच्या बँक खात्यासह कंपनीच्या कागदपात्रांची तपासणी करण्यात आली. यात पोलिसांना एकट्या रवी अग्रवाल यांनी महिनाभरात 1800 किलो तुपाची खरेदी केली आहे. तसेच ही खरेदी अग्रवाल यांनी त्यांच्या वडीलांच्या खात्याद्वारे केली असल्याचे समोर आले आहे.

महिनाभरातील उत्पादनापेक्षा तुपाची दुप्पट विक्री
VISUAL STORY : हिरवी साडी, कपाळावर कुंकू, भडक लिपस्टिक झुमके, बांगड्या घालून दिसला ‘हा’ अभिनेता

अपहारातील तुपाचा वाढणार आकडा

दूध संघाकडून जळावातील अनिल अग्रवाल व अकोल्यातील रवी अग्रवाल यांनाच तुपाची विक्री केली आहे. दूध संघात उत्पादन झालेल्या 1800 किलो तुप हे एकट्या रवी अग्रवाल यांनी खरेद केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. तर उर्वरीत तितकेच तुप अनिल अग्रवाल यांनी देखील खरेदी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. उत्पादनापेक्षा दुप्पट तुपाची विक्री झाल्याचे उघड झाले असल्याने या अपहरातील तुपाचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

महिनाभरातील उत्पादनापेक्षा तुपाची दुप्पट विक्री
VISUAL STORY : वय 55, तरीही तीला पाहताच उरात होतेय 'धकधक'....
महिनाभरातील उत्पादनापेक्षा तुपाची दुप्पट विक्री
VISUAL STORY : तिच्या सौंदर्यासोबतच तीने दिलेल्या 'या' प्रश्नाच्या उत्तराने 1994 मध्ये ती बनली होती 'विश्व सुंदरी'

अन्न, सुरक्षा तपासणी अधिकार्‍यांकडून चौकशी

अखाद्य तुपाचा चॉकलेटमध्ये वापर केल्यामुळे अग्रवाल यांच्यावर कारवाईसाठी पोलिसांनी अन्न व सुरक्षा तपासणी विभागाला पत्र दिले होते. तसेच अकोला येथून अग्रवाल यांच्या कंपनीतून त्यांनी चॉकलेटचे नमुने जप्त केले होते. ते नमुने तपासणीसाठी अन्न व औषध तपासणी पथकाला देणार आहे. तसेच या विभागाकडून शनिवारी चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर रवी अग्रवाल यांच्यावर पुढील कार्यवाही होणार आहे.

महिनाभरातील उत्पादनापेक्षा तुपाची दुप्पट विक्री
Visual Story : गर्लफ्रेंडचे ३५ तुकडे अन् ते १८ दिवस!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com