वन जमीनप्रकरणात खोट्या 7/12 उतार्‍यांद्वारे विक्री!

अटकेतील सर्व सातही संशयितांना एक दिवसांची पोलीस कोठडी
वन जमीनप्रकरणात खोट्या 7/12 उतार्‍यांद्वारे विक्री!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

वन जमीन प्रकरणी (matter of forest land) आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offenses Branch) बुधवारी सात जणांना अटक (Seven people were arrested) केली आहे. आतापर्यंत अटकेतील आरोपींची संख्या 17 झाली आहे. दरम्यान, खोट्या (False) सातबारा उतार्‍यांद्वारे जमिनींचा व्यवहार (Dealing with lands) झाला असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले असून इतर विभागातील अस्तित्वात नसलेल्या जमिनीचा व्यवहार होवून नागरिकांची फसवणुक (Fraud of citizens) तर झाली नाहीना. याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

भुसावळ तालुक्यातील कंडारी शिवारातील शेतगट क्रमांक 12, 13, 19, 374 ते 378 व 403 ते 405 भागपूर गट नं 64 ते 66, 76, 102, 111, 121, 125, 126, 128, 129, 135, 136 या शेत जमिनी वनविभागाच्या आहेत. शासन भूमिहीन लोकांना एकरी एक लाख रुपये नजराणा भरुन त्यांच्या नावावर करीत आहेत.

असे मुख्य संशयित मुकूंद बलविरसिंह ठाकूर व त्याच्या साथीदारांनी लोकांन भासवून भूमिहीन संशयित दिलीप पंडीत सोनवणे यांच्यासह 43 जणांना सोबत घेतले. तसेच रविंद्र पंढरीनाथ बहादरे यांनी भूमिहीन संशयितांच्या नावाचे बनावट सातबारा उतारे व ड पत्रके तयार करुन त्याद्वारे आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने जमिनींचे खरेदीखत तयार करुन त्या जमिनींचा 5 कोटी 39 लाख 91 हजारात विक्री केल्या होत्या. याप्रकरणी 43 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुख्य संशयित पोलिसांना गवसेना

वन जमिनी प्रकरणात आतापर्यंत सुमारे 17 जणांना अटक करण्यात आली असून मुख्य संशयित मुकुंद बलविरसिंह ठाकूर रा. प्लॉट क्र. 7 बळीराम पेठ हा अद्याप फरार आहे. तसेच सुरेंद्र बलविरसिंह ठाकूर, तत्कालीन तलाठी रविंद्र पंढरीनाथ उर्फ पितांबर बहादरे रा. ऑडीटर कॉलनी, अ‍ॅड. प्रदीप निवृत्तीनाथ कुलकर्णी रा. आनंदकॉलनी दादावाडी, सतिष प्रल्हाद सपकाळे रा. भारत डेअरी नवीपेठ हे चार संशयितांना अटकपुर्व तर रुपेश भिकमचंद तिवारी रा. इंद्रप्रस्थ नगर, कैलास दशरथ बारी, राजेंद्र बुधोजी बारी, सुभाष दशरथ बारी, गणेश विठ्ठल बारी, सुनिल दशरथ बारी सर्व रा. नवीपेठ हे संशयित जामिनावर असून मुख्य संशयित अद्याप मिळून आलेला नाही.

सात संशयितांना एक दिवसाची पोलीस कोठडी

या प्रकरणात बुधवारी दिलीप पंडीत सोनवणे रा. सुप्रिम कॉलनी, पंकज रमेश पाटील रा. जानकीनगर, रमेश आनंदा पाटील रा. निशाने बु. ता. धरणगाव, महेश रमेश पाटील रा. जानकी नगर, सादीक खान शब्बीर खान रा. इस्लामपुरा, रविंद्र विक्रम हटकर रा. हरिविठ्ठलनगर व अखंड सीताराम सिंग रा. सुप्रिम कॉलनी या सात संशयितांना अटक करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com