मध्यप्रदेशातून चोरलेल्या दुचाकी वाहनांची महाराष्ट्रात विक्री

मध्यप्रदेशातून चोरलेल्या दुचाकी वाहनांची महाराष्ट्रात विक्री

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

मध्यप्रदेशातून (Madhya Pradesh) चोरुन (stolen) आणलेल्या दुचाकी (two wheelers) कमी किंमतींमध्ये विक्री करणार्‍या अट्टल दुचाकी चोरटा अजय अंबालाल पावरा (वय-27, रा. वकवड ता. शिरपूर, जि. धुळे) याच्या अमळनेर येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीच्या 14 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून यातील बहुतांश गाड्या या मध्यप्रदेशातील आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्यातील वकवड येथील अजय पावरा हा मित्रांसह त्यांच्या नातेवाईकांना कमी किंमतींमध्ये दुचाकी विक्री करीत आहे. तसेच हा चोरट्याने अमळनेर शहरातून देखील दुचाकी चोरल्या असून तो या दुचाकी नाशिक येथे विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांनी लागलीच पथक तयार करुन संशयिताला ताब्यता घेण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार अजय हा संशयितरित्या अमळनेरात फिरत असतांनाच एलसीबीच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. यावेळी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने मध्यप्रदेशासह अमळनेर येथून चोरी केलेल्या 14 दुचाकी काढून दिल्या.

चोरलेल्या बहुतांश दुचाकी या मध्यदेशातून चोरी केलेल्या असून यामध्ये सर्वाधिक गाड्या या एचएफ डिलक्स या आहेत. त्याला पुढील कार्यवाहीसाठी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

या पथकाची कारवाई

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ रवी नरवाडे, पोहेकॉ राजेश मेंढे, संजय हिवरकर, गोरख बागुल, कमलाकर बागुल, संदीप पाटील, संदीप साळवे, पोना प्रवीण मांडोळे, ईश्वर पाटील, पोकॉ लोकेश माळी, अशोक पाटील यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com