ब्रॅण्डेड कंपनीचा लोगो वापरून कपड्यांची विक्री करणे भोवले

ब्रॅण्डेड कंपनीचा लोगो वापरून कपड्यांची विक्री करणे भोवले

जळगाव - jalgaon

शहरात एका ठिकाणी सेल (Cell) लावून कपडे विक्री (Selling clothes) करणाऱ्या व्यावसायिकाला ब्रॅण्डेड कंपनीचा लोगो (Branded company logo) वापरून कपड्यांची विक्री करणे महागात पडले. या सेलवर (police) पोलीसांनी छापा टाकत सदर व्यावसायिकावर पोलीस कारवाई सुरू आहे.

जळगाव शहरातील हॉटेलचे सभागृह भाड्याने घेत याठिकाणी कपडे विक्री व्यवसाय (सेल) लावला होता. ब्रँडेड कपंनीच्या नावाचा लोगो वापरून विविध प्रकारचे कपडे विकण्याचा धंदा सुरू होता. सदर कंपनीने नेमून दिलेल्या फिल्ड एक्झेक्यूटीव्ह ऑफीसर यांना याबाबतची माहिती मिळताच सदर ठिकाणी जावून पाहणी केली व तत्काळ पोलीसात याबाबत तक्रार केल्याने रामानंद नगर पोलीस विभागाने कारवाई करत तेथील मुद्देमाल हस्तगत करत पोलीस कारवाई केली जात आहे.

Related Stories

No stories found.