पोलिसांत तक्रार केल्याने सालदार कुटुंबाला मारहाण

चाळीसगाव : मेहूणबारा पोलीसात गुन्हां दाखल
पोलिसांत तक्रार केल्याने सालदार कुटुंबाला मारहाण

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी -

तालुक्यातील मादुर्णे (Madurane) येथील शेत मळ्यात सालदार (Saldar's) म्हणून काम करीत असलेल्या कुटूंबावर (family) लग्न मोडल्याचा (marriage broke up) वादातून पोलीसांत (police) मारहाणीची तक्रार (Complaint) दाखल केल्याचा राग येवून पिलखोड येथून आलेल्या चौघांनी रात्रीच्या अंधारात हल्ला (Attack) केल्याची घटना मादुर्णे येथे घडली आहे. याप्रकरणी मेहूणबारा पोलीसांत गुन्हां दाखल करण्यात आल आहे.

विजय येडू शिंदे (Vijay Yedu Shinde) हा (रा. पुरमेपाडा, धुळे हल्ली मुक्कम मादुर्णे येथील केतन पाटील यांच्या मळ्यात) याच्या पुतण्याचे लग्न (married) भडगांव तालुक्यात जमलेले होते. मुलीकडच्या लोकांनी चुकीच्या माहितीच्या (Wrong information) आधारावर लग्न मोडले म्हणून विजय शिंदे याची भावजयी (Bhavjayi) ही तळणी वस्ती पिलखोड येथे लग्न मोडल्या बाबतचा जाब विचारण्यासाठी गेली असता, तेथे भावजयी विमलबाई शिंदे हिला मारहाण (Beating) करण्यात येवून तीच्या गळ्यातील पोत तोडण्यात आली.

याबाबतची तक्रार (Complaint) विमलबाई शिंदे (Vimalbai Shinde) हीने पोलीसात दिल्यानंतर भितीपोटी विजय शिंदे यांचे कुटूंबिय रात्री गाव सोडून (Leaving the village) मुळगावी पुरमेपाडा येथे जाण्याच्या तयारीत असतांना, रात्री ११.३० वाजेच्या सुमारास छोटू मोरे, पवन जीवन जाधव, मोहन जीवन जाधव, समाधान संतोष जाधव सर्व रा. तळणी वस्ती यांनी पोलीसांत तक्रार का दिली? या कारणावरुन संजय शिंदे याची भावजयी व संपूर्ण कुटूंबाला शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण (Beating) केली.

यावेळी छोटू याने हातातील कुर्‍हाडीने मारहाण केली. यावेळी झालेल्या आरडा-ओरडीत वरील चारही मारेकरी (Killer) पळून गेले असल्याचे जखमी विजय शिंदे याने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला (Mehunbare police station) छोटू मोरे, पवन जीवन जाधव, मोहन जीवन जाधव, समाधान संतोष जाधव सर्व रा. तळणी वस्ती यांच्या विरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com