सख्ख्या बहिणीचा विनयभंग करणार्‍या भावाला तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

जामनेर न्यायालयात केवळ 72 दिवसात निकाल
सख्ख्या बहिणीचा विनयभंग करणार्‍या 
भावाला तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

जामनेर Jamner । प्रतिनिधी-

तालुक्यातील एका गावात भावाने (Brother) त्याच्या सख्ख्या बहिणीचा विनयभंग (molested his sister) केल्याने न्यायालयाने (Court) त्यास तीन वर्ष सक्त मजुरी (three years of hard labour) व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा थोटावली आहे.

याबाबत गुन्ह्याची थोडक्यात माहिती अशी, की तालुक्यातील एका गावात भावाने दि.28 मार्च 2022 रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास त्याची बहिण आईजवळ झोपलेली असताना दारूच्या नशेत येऊन व बहिण गाढ झोपेत असल्याचे पाहून त्याने तिचा विनयभंग केला. त्याचवेळी बहिणीने आरडा ओरड करून आईला उठवले.

आईने त्याचे तावडीतून मुलीला सोडविले. मात्र माझ्या मनासारखे न करू दिल्यास दोघांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी त्यानेे आई व बहिणीला दिली. या प्रकरणी त्याच्या बहिणीने जामनेर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.

सरकार पक्षातर्फे या खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी व तिची आई यांची साक्ष महत्त्वाची ठरली. खटल्यात युक्तिवाद करताना सरकारी वकील अ‍ॅड. कृतिका भट यांनी न्यायालयास सांगितले, की आरोपीने केलेला हा गुन्हा अत्यंत घृणास्पद असून त्यास जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी. त्यामुळे आरोपी पुन्हा असे कृत्य करण्यास धजावणार नाही व समाजात चांगला संदेश जाईल.

हा खटला न्यायाधीश दि.न.चामले यांचे न्यायालयात चालला. खटल्याचा निकाल हा अतिशय शीघ्रगतीने 2 महिने 12 दिवसात लागला. त्यामुळे वकील वर्गात व पक्षकारांमध्ये आनंद व्यक्त केला. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. कृतिका भट यांनी काम पाहिले. तर त्यांना पोलीस कॉन्स्टेबल निलेश सोनार यांनी मदत केली. गुन्ह्याचा तपास पो .हे .का .साहिल तडवी यांनी केला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com