अमळनेरात पू. साने गुरुजी साहित्यनगरीत शनिवारपासून रंगणार साहित्य संमेलन

दोन दिवस कविसंमेलन, परिसंवाद आणि कथाकथणाची मिळणार बौद्धिक मेजवाणी
अमळनेरात पू. साने गुरुजी साहित्यनगरीत शनिवारपासून रंगणार साहित्य संमेलन

अमळनेर Amalner (प्रतिनिधी)

येथील मराठी वाङ्मय मंडळ (Marathi Literary Society) व आप्पासाहेब केले सार्वजनिक ग्रंथालयातर्फे (Appasaheb Kele Public Library) ३ व ४ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे (District Level Literary Conference) आयोजन अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात (Pratap College) करण्यात आले आहे.

संमेलनस्थळाला पू.साने गुरुजी साहित्य नगरी नाव देण्यात आले आहे. दोन दिवस कविसंमेलन, परिसंवाद, कथाकथणाची मेजवाणी मिळणार आहे.या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. प्रांजल पाटील तर संमेलनाध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हे असतील.

अमळनेरात पू. साने गुरुजी साहित्यनगरीत शनिवारपासून रंगणार साहित्य संमेलन
VISUAL STORY : जर्सी चित्रपटातील मृणालच्या या अवतारावर चाहते झालेत फिदा

दि.३ डिसेंबरला ग्रंथ पूजन सोहळा तसेच वा. रा. सोनार ग्रंथ दालन उद्घाटन दुपारी ३ वाजता सुप्रसिद्ध वास्तु विशारद चेतन सोनार यांच्या हस्ते ग्रंथ पूजनाने संपन्न होईल. साहित्य संमेलन उद्घाटन सोहळा सायंकाळी ४.३० ला सुप्रसिद्ध साहित्यिक मा.प्रभाकर साळेगावकर यांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी सभा मंडपात होईल.

याप्रसंगी अ भा म सा प चे कार्याध्यक्ष नरेंद्र पाठक, साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य नवनाथ गोरे, पुष्पराज गावंडे, सचिव मीनाक्षी पाटील, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल, साहित्यिक वि. दा. पिंगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

साहित्य संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन संमेलन समिती प्रमुख कवि रमेश पवार अमळनेर म वा मंडळ अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी केलेले आहे.सायंकाळी ६.३०ला ज्येष्ठ कवी पांडुरंग सुतार यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कवी शशिकांत हिंगोणेकर हे उपस्थित राहतील.

अमळनेरात पू. साने गुरुजी साहित्यनगरीत शनिवारपासून रंगणार साहित्य संमेलन
हातगांव शिवारात सहा क्विटल कापूस चोरीस

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी दि. ४ डिसेंबरला कविवर्य बालकवी ठोंबरे कवी कटाचे उद्घाटन प्रा. नरेंद्र पाठक यांच्या हस्ते होईल. कविकट्टा आयोजन समितीचे डॉ. कुणाल पवार यांच्या उपस्थितीत होईल. सकाळी ९ वाजता "सोशल मीडिया आणि त्याचा समाज जीवनावर होणारा परिणाम" या विषयावर लेखक, विचारवंत प्रा डॉ एल ए पाटील यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

सदर परिसंवादात प्रा. डॉ.रमेश माने, प्रा.ज्ञानेश्वर कांबळे, प्रा. उषा पाटील, साहित्यिक वि.दा. पिंगळे आदी सहभागी होतील. दुपारी ११ वाजता सुप्रसिद्ध साहित्यिक अॅड. विलास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन कार्यक्रम होणार असून त्यात साहित्यिक गोकुळ बागुल, प्रा. सौ. योगिता पाटील, सुनिल गायकवाड आदी मान्यवर सहभाग घेतील.

सदर जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचा समारोप समारंभ हा विचारधारा प्रशाळा व क. ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. म. सु. पगारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com