भरधाव डंपरची दुचाकीला धडक : वृद्ध गंभीर जखमी

मानराजपार्कजवळील घटना
भरधाव डंपरची दुचाकीला धडक : वृद्ध गंभीर जखमी

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

महामार्गावरुन भरधााव वेगाने जाणार्‍या डंपरने (dumper) दुचाकीला धडक (Hit the bike) दिली. या अपघातात दुचाकीस्वार वृध्द जखमी (Elderly injured) झाल्याची घटना शिवकॉलनी ते मानराजपार्क दरम्यान घडली. याप्रकरणी डंपरचालकाविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील निवृत्तीनगरात साहबराव कौतिक सैंदाणे (वय-65) हे वास्तव्यास आहेत. ते 21 डिसेंबर रोजी त्यांच्या दुचाकीने संध्याकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास शिवकॉलनीकडून मानराजपार्क परिसरातून जाणार्‍या महामार्गावरुन जात होते, यादरम्यान रेल्वे पूलावर त्यांच्या दुचाकीला भरधाव डंपरने धडक दिली.

यात दुचाकीवरुन खाली पडल्याने साहेबराव सैंदाणे यांना दुखापत झाली आहे. तर दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळाहून पसार झाला. याप्रकरणी साहेबराव सैंदाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com