ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन म्हणतात तरुणांनी राजकारणात यावे!

ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन म्हणतात तरुणांनी राजकारणात यावे!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

लेवा गुर्जर समाज (Lewa Gurjar Samaj) रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. सधन शेतकरी आहेत. आर्थिकदृष्टया समाज (Financially able) सक्षम आहे. समाजात मिळून मिसळून काम करावे. समाजातील तरुणांसह (youth) चांगल्या लोकांनी (People) राजकारणात (politics) पुढे या, असा सल्ला ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन ()Rural Development Minister Girish Mahajan यांनी दिला.श्री लेवा गुर्जर सेवा प्रतिष्ठान (Shri Lewa Gurjar Seva Pratishthan) जळगावतर्फे रविवारी सकाळी 10 वाजता सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन, जळगाव येथे राज्यस्तरीय युवक-युवती परिचय (State level Youth and Youth Introduction Meeting)मेळावा घेण्यात आला.त्याप्रसंगी ते बोलत होते.

Kaushik K Shil
ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन म्हणतात तरुणांनी राजकारणात यावे!
नाडगाव येथील १९ वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या
Kaushik K Shil

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय गुर्जर परिषदचे अध्यक्ष अ‍ॅड. शांताराम महाजन हे होते. तर प्रमुख पाहुणे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, दिल्ली येथील गुर्जर परिषदेचे राष्ट्रीय सचिव राजकुमार लोहिया, प्रदेश गुर्जर परिषदेच्या महिला अध्यक्षा सरस्वतीचंद्रिका लोहिया, विरगुर्जर सेना दिल्लीच्या राष्ट्रीय अध्यक्षा ममता भाटी, शरद महाजन, डॉ.सुरेश पाटील,जगदीश पाटील, बन्सीलाल पाटील, डॉ.जयंत पाटील, भारती पाटील, कैलास चौधरी, राजीव पाटील, रामदास सूर्यवंशी, गजानन महाजन, रोहिदास चौधरी, वसंत महाजन, विनोद पाटील, आदी उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन म्हणतात तरुणांनी राजकारणात यावे!
फेकरी रेल्वे उड्डाण पुलावर भीषण अपघात
ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन म्हणतात तरुणांनी राजकारणात यावे!
Photo # गाढेगाव येथील ओढयावर पक्षी निरीक्षण कार्यक्रमात ४५ प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी तरुणांनी व्यसनमुक्त राहून उत्तम शेती करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच समाजाने देखील शेतकरी मुलांकरिता सकारात्मक पाऊल पुढे करुन त्यांच्याशी नाळ जोडावी, असे आवाहन ना.पाटील यांनी केले. तसेच यावेळी प्रमुख मान्यवरांनी युवक-युवती आणि त्यांच्या पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. दरम्यान या मेळाव्यात युवक युवतींनी आपला परिचय करुन दिला. दुपारनंतर समाजबांधांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन देखील करण्यात आले होते.

ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन म्हणतात तरुणांनी राजकारणात यावे!
दुःखाचा डोंगर डोक्यावर घेऊन हिमांशूने केले नेव्ही मर्चंटमध्ये पदार्पण

या मेळाव्यास दीड ते दोन हजार समाज बांधवांची उपस्थिती लाभली होती. सूत्रसंचालन क्रांती पाटील व अ‍ॅड. प्रदीप महाजन यांनी केले. आभार सुनिल चौधरी यांनी मानले. यशस्वीतेसाठी श्री लेवा गुर्जर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र महाजन व कार्यकारिणीने परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com