स्टेटबँक कॉलनीतील दोन बंद फ्लॅट फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल
स्टेटबँक कॉलनीतील दोन बंद फ्लॅट फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

जळगाव- jalgaon

शहरातील रिंगरोड परिसरातील स्टेटबँक कॉलनीतील (State Bank Colony) निर्णयसागर अपार्टमेंट (Nirnayasagar Apartment) आहे. याठिकाणावरील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी (thieves) ३ लाख ३८ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणी जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रिंगरोड परिसरात निर्णयसागर अपार्टमेंट (Nirnayasagar Apartment) आहे. या अपार्टमेंटमध्ये ज्योती प्रमोद पाटील (वय-५२) या फ्लॅट नं.२ मध्ये कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत.तर त्यांच्या वरच्या मजल्यावरील फ्लॅट मध्ये त्यांच्या सासुबाई एकट्याच राहतात. त्यांचे पती प्रमोद पाटील जिल्‍हा न्यायालयात वकील आहेत तर मुलगा वरुण पुणे येथे नोकरीला आहे. पाटील कुटूंबीय दि. १८ रोजी घर बंद करून पुणे येथे आपल्या मुलाकडे गेले होते. त्यांच्या घराकडे त्यांच्या सासूबाई लक्ष ठेऊन होत्या.

दि.३० रोजी सोमवारी ज्योती पाटील या मुलगी मेघासह जळगावी परतल्या घरी आल्यावर त्यांना फ्लॅटचा मुख्य दरवाजा तुटलेल्या (main door is broken) अवस्थेत दिसून आला. त्यांनी शेजारच्यांना आरडाओरड करुन बोलावुन घेतले. यावेळी त्यांच्या शेजारी राहणारे अशोक जोशी यांनी तत्काळ धाव घेत पोलिसांना (police) घटनेची माहिती दिली.

श्वान पथकाकडून पुरावे संकलीत

चोरट्यांनी (thieves) दारचाा कडीकोयंडा तोडून आतील कपाटातील रोकड, दागिने, बँकेचे पासबुक, आधारकार्ड पॅनकार्ड, एटीएम कार्ड असे एकूण 3 लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घटनेची माहिती मिळताच जिल्‍हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी केली. दरम्यान, श्वानपथकाने (dog squad) व गुन्हशाखेच्या पथकाने घटनास्थळावरुन काही पुरावे संकलीत केले. त्यानंतर पंचनामा (Panchnama) केल्यावर ज्योती पाटील यांच्या तक्रारीवरुन जिल्‍हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा लांबविला मुद्देमाल

चोरट्यांनी पाटील यांच्या बेडरुम मधील कपाटातून १ लाख ९४ हजार रोकड, ३ हजार रुपये किंमतीचे दोन चांदिचे ग्लास, ब्रिटीश कालीन चांदिचे नाणे, ३ हजारांच्या पायातील चांदीच्या साखळ्या, १ ग्रॅम सोन्याचा शिक्का, १५ ग्रॅम वजनाचे ५ चांदिचे शिक्के, बँक ऑफ महाराष्ट्राचे पासबुक, बँक ऑफ इंडियाचे एटीएम कार्ड, पॅन कार्ड आधारकार्ड, असा मुद्देमाल लंपास (Muddamal Lampas) केला.

याच अपार्टमेंट मधील दोन फ्लॅट फोडले

चोरट्यानी याच अपार्टमेंट मधील फ्लॅट क्रमांक ४ व ५ मधील रहिवासी छाया प्रकाश महाजन यांच्या फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी १ लाख ३० हजार रुपयांचे सेान्याची चैन, २३ हजार रुपये किंमतीचे सेान्याचे मणी, ३३ हजार रुपयांचे कानातील सोन्याचे जोड, ४९ हजाराची नाकातील नथ, ५ हजार ६०० रुपयांचे हातातील वाळे,चांदीच्या तोरड्या, १ तोळा सेान्याचे पेंडल, १ लाख ८ हजार रुपयाचा पाच भार वजनाचा चांदीचा कंबरपट्टा, लाकडी कपाटातून १ लाख २५ हजार रोख रक्कम असा एकूण ३ लाख २८ हजार ४०० रुपयांचा एकुण ऐवज चोरीला गेला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com