रावेर मतदारसंघातील रस्त्यांसाठी 19 कोटी रूपयांचा निधी मंजूर

रावेर मतदारसंघातील रस्त्यांसाठी 19 कोटी रूपयांचा निधी मंजूर

रावेर Raver|प्रतिनिधी-

विधानसभा क्षेत्रातील आदिवासी (Tribal) व सार्वजनिक बांधकामाच्या (public works) ११ रस्त्यांसाठी (roads) १९ कोटी रूपयांचा निधी मंजूर (Funding approved) झाला असल्याची माहिती आमदार शिरीष चौधरी (MLA Shirish Chaudhary) यांनी दिली आहे.

आमदार शिरीष चौधरी रावेर
आमदार शिरीष चौधरी रावेर

रस्त्यांचा प्रस्ताव मंत्रालयीन पातळीवर सादर करून पुरवणी अर्थसंकल्पात याचा समावेश करून घेतला आहे. या १९ कोटीच्या निधीतून रावेर-यावल तालुक्यातील रस्त्यांची कामे होणार आहेत.आमदार शिरीष चौधरी यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधीचा निधी खेचून आणला आहे.

या निधीतून रावेर यावल तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील बोरखेडा ते मोहमांडली रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, उमरठी वैजापूर लंगडा आंबा पाल कुसुंबा रावेर रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण,लालमाती ते आभोडा रस्ता, मजबूतीकरण व डांबरीकरण,परसाळे वर्डी मोहराळे रस्ता सुधारणा,जिन्सी ते सांबरपाट रस्त्याचे जलनिस्सारणाच्या कामासह मजबूतीकरण व डांबरीकरण, भुसावळ जामनेर फत्तेपूर मोताळा तरवाडी पिपलगांव खामगांव रस्ता सुधारणा करणे,नायगांव सावखेडासिम दहिगांव यावल भुसावळ खडका किन्ही सुसरी तळवेल गोडेलगांव भांघेडा रस्ता सुधारणा करणे,भुसावळ जामनेर फत्तेपूर मोताळा तरवाडी पिपलगांव खामगांव रस्ता रामा सुधारणा करणे, सावखेडा परसाळे डोंगर कठोरा भालोद बामणोद विरोदा पिंपरूळ फेैजपूर रस्ता रूंदीकरणासह सुधारणा करणे इ. कामांना मंजूरी देण्यात आल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.