Photos # चार थर लावून फोडली राजेशाही दहीहंडी

Photos # चार थर लावून फोडली राजेशाही दहीहंडी
Sam D.Photography

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील एल.के.फाऊंडेशन आयोजित राजेशाही थाटाची (Royal Dahihandi) मराठमोळी दहीहंडीचे (Marathmoli Dahi Handi) आयोजन करण्यात आले होते. तरुण कुढापाच्या गोविंदा पथकाने (Govinda Squad of Tarun Kudhapa) चार थर लावित दही हंडी फोडण्याचा (break curds neck) मान पटकाविला. यावेळी उपस्थितांकडून हाथी घोडा पाल की जय कन्हैया लाल की म्हणत शहराभरातील गोविंदा पथकांनी या ठिकाणी अक्षरशः कल्ला करत, दहीहंडी उत्सवाचा उत्साह वाढवला.

शहरातील सागर पार्क मैदानावर एल.के. फाऊंडेशन कडून राजेशाही थाटाच्या मराठमोळ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, आमदार सुरेश भोळे, एल.के.फाऊंडेशनचे अध्यक्ष ललित कोल्हे, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांच्यासह नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोविंदा पथक दहीहंडीला सलामी देत असतांना निवृत्ती नावाचा एक गोविंदा थेट के्रनवर चढला. बचर्‍याच उंचीवर तो पोचहल्यानंतर आयोजकांनी त्याला खाली उतरण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गोविंदा हा खाली उतरल्यानंतर त्या गोविंदा पथकाला समज देण्यात आली.

ढोल ताशांसह डी.जे वर थिरकली तरुणाई

दहीहंडी सोहळ्यात पारंपरिक ढोल ताशांच्या गजरासह डी.जे.च्या तालावर तरुणाईने एकच ठेका धरला होता. दहीहंडी फोडण्यासाठी शहरभरातील गोविंदा पथकं मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या अथक प्रयत्नांनतर अखेर दहा वाजता तरुण कुढापा मंडळाच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा मान पटकाविला.

क्रेनवर चढला गोविंदा

गोविंदा पथक दहीहंडीला सलामी देत असतांना निवृत्ती नावाचा एक गोविंदा थेट के्रनवर चढला. बचर्‍याच उंचीवर तो पोचहल्यानंतर आयोजकांनी त्याला खाली उतरण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गोविंदा हा खाली उतरल्यानंतर त्या गोविंदा पथकाला समज देण्यात आली.

कर्तव्यदक्ष अधिकारी अन् वडीलही

दहीहंडीचा सोहळा शांततेत पार पडावा यासाठी पोलिस प्रशानाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा हे काव्यरत्नावली चौकात आले. यावेळी त्यांनी आपल्या मुलाला कडेवर घेत त्यांनी एक कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याबरोबर वडीलांची जबाबदारी तितक्याच चोखपणे बजावली. त्यामुळे इतरांचे लक्षही वेधले गेले.

तरुणींची दहीहंडी लक्षवेधी

युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे शुक्रवारी काव्यरत्नावली चौक जळगाव येथे सायंकाळी 6 वाजेपासून तरुणींची दहीहंडी आयोजित करण्यात आली होती.. यंदा आयोजनाचे 14 वे वर्ष होते. डॉ. जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे मुलींचे गोविंदा पथक, शिवतांडव प्रतिष्ठान चे 130 वादकांचे ढोल पथक, हायटेक लाईटस, श्रीकृष्ण वेषभूषा स्पर्धा, मल्लखांब चे थरारक प्रात्यक्षीक, सांस्कृतिक नृत्य आदी. या दहीहंडी महोत्सवाचे मुख्य आकर्षण होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com