‘ते’ हल्लेखोर शिवसेनेचेच; रोहिणी खडसेंचा दावा

रोहिणी खडसे
रोहिणी खडसे

जळगाव | Jalgaon

राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेंच्या (Eknath Khadse) कन्या, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या कारवर अज्ञात गुंडांनी हल्ला (Attack) केल्याची घटना घडली. या हल्ल्यामुळे जिल्ह्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी (Shivsena-NCP) वादातून हा प्रकार घडल्याच्या चर्चांना उधाण आले आहे...

याबाबत खुद्द अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, तीन दुचाकीवरून सात जण आले. यातील तीन जण शिवसेनेचे पदाधिकारी होते. एकाच्या हातात पिस्तूल, एकाच्या हातात तलवार तर तिसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होता.

त्यातील एकाने मी गाडीत बसलेल्या बाजूने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने काचेवर हल्ला चढविला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, हा हल्ला मला घाबरविण्यासाठी होता. मला मारण्यासाठीच हे तीन जण आले होते. मात्र मी यांना घाबरणारी नाही. मी महिलांच्या पाठीशी खंबीरपणे आहे. बोदवड नगरपंचायतीच्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनीच माझ्यावर हा हल्ला केल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे.

हल्ला करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नावेदेखील रोहिणी खडसे यांनी सांगितली आहेत. खडसे यांनी सांगितल्यानुसार, सुनील पाटील, पंकज कोळी व छोटू भोई या तिघांचा समावेश आहे.

दरम्यान, रोहिणी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांना हल्ल्याबाबत माहिती दिल्याचे एकनाथ खडसे यांनी ‘देशदूतशी’ बोलतांना सांगितले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com