चाळीसगाव येथे दरोड्याचा डाव फसला

चाळीसगाव येथे दरोड्याचा डाव फसला

चाळीसगाव ग्रामीण पोलीसांकडून चौघांना अटक

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

चाळीसगाव-नांदगाव रोडवर हॉटेल तिरंगासामोर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान दरोड्या टाकण्याचा प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक टाटा सुमो गाडी, पाच कटर, दोरी, मिरचीची पुड व दोन लोखंडी टॅामी असे साहित्य मिळुन आले आहे.

याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला शेख साईद शेख इस्त्राईल(वय १७), फैजान शेख फारुख( वय १८) मन्नान शेख जब्बार शेख(वय २०) सलीम मोहंमद शरीफ(वय २२) सर्व रा.मालेगाव, मोटारसायंकलवरील इसम शकील पूर्णनाव माहिती नाही व त्यांच्यासोबत एक इसम नाव माहिती नाही यांच्या विरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com