
मुक्ताईनगर-प्रतिनिधी Muktainagar
आज दि.२१ मे २०२२ शनिवार रोजी आमदार चंद्रकात पाटील (MLA Chandrakat patil) हे मतदार संघातील विवाह सोहळे व विविध कार्यक्रमांना भेटी देण्यासाठी निघालेले असताना त्यांना राष्ट्रीय महामार्ग (National Highways) क्र.६ वरील मुक्ताईनगर ते जळगाव (jalgaon) दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या बोहर्डा-बोहर्डी गावाजवळ कॅमेरा व्दारे वाहनांचे गतीची नोंद असलेले फोटो कॅपचर करुन वाहन धारकांना (Vehicle holder) ऑनलाईन दंड आकारला जात असल्याचे आढळून आले.
विशेष म्हणजे जिथे जिल्हा पोलीस विभागाच्या वाहतूक शाखेचे वाहनातून दुर्बीण व्दारे वाहनांचे गतीची नोंद असलेले फोटो काढून तसेच महामार्गावर कुठल्याही प्रकारचे वेग मर्यादेचे सूचना असलेले फलक लावलेले नाही. त्यामुळे आमदार पाटील यांनी येथे वाहन थांबवून संबंधीत कर्मचाऱ्यांना याबद्दल जाब विचारला व जिथे तुम्ही कर्तव्य बजावित आहात या ठिकाणी वाहन वेग मर्यादेच्या सूचना फलक कुठेयं? ही कसली मनमानी करीत आहात वाहन धारकांची लूट कोणाच्या आदेशावरून करीत आहात असा खडा सवाल विचारला व याबाबतीत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे (District Superintendent of Police Dr. Praveen Munde) यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली.
वाहन धारकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून त्यामुळे राष्ट्रिय महामार्गावर ठीकठिकाणी वेग मर्यादेचे सूचना फलक लावण्यात यावे व तात्काळ केलले दंड रद्द करण्यात यावे अशा सूचना त्यांनी यावेळी बोलतांना केल्या.