रस्ते नाही केेले.. मग आम्ही भरलेला कर परत करा

रस्ते नाही केेले.. मग आम्ही भरलेला कर परत करा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

मागील दहा वर्षापासून जळगाव शहरातील शिवाजीनगर भागात (Shivajinagar area) एकही रस्ता (no road) महानगर प्रशासनाने (Metropolitan Administration) तयार केलेला नाही. तसेच परिसरात अस्वच्छता (unsanitary,), वेळेवर पाणीपुरवठा (No water supply) नाही अशा अनेक समस्या (problem) मनपा प्रशासन (municipal administration,), लोकप्रतिनीधी (People's representatives) सोडवत नसेल (Will not solve) तर आम्ही दहा वर्षापासून भरलेला कर (tax paid) आम्हाला परत करावा (should be returned) अशी मागणी (demand) शिवाजीनगरातील (Shivaji Nagar) रहिवासी श्रीधर चौधरी (Resident Sridhar Chaudhary) यांनी पत्रकार परिषदेत केली.

शिवाजीनगरातील समस्यांबाबत शनिवारी तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हा सरचिटणीस श्रीधर चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी पुढे, बोलतांना चौधरी म्हणाले, की दर वर्षी मनपा प्रशासन नागरिकांकडून न चुकता कर घेतात. परंतू नागरिकांना मुलभूत सुविधा शुन्य मिळत आहे. मनपा अधिकारी, कर्मचारी तसेच नगरसेवक यांच्या सहमतीने शिवाजीनगरातील नागरिकांना मुद्दाम त्रास दिला जात आहे.

रस्तेे नाही, वेळेवर पाणी नाही, नियमीत सफाई नसल्याने जागोजागी कचर्‍यांचे ढीग त्यामुळे परिसरात रोगराई पसरलेली आहे. त्यामुळे आम्ही दहा वर्षापासून भरलेला कर आम्हाला परत मिळावा यासाठी सोमवारी 31 ऑक्टोबर रोजी महापालिका इमारतीसमोर सकाळी अकरा वाजता उपोषण केले जाणार आहे.

याबाबत जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलिस अधिक्षकांंना 14 ऑक्टोबरला निवेदन दिले. परंतू याची कोणीच दखल घेतलेली नाही. अशी माहिती चौधरी यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com