वाहतुकीचे नियम माहीत नसल्याने रस्ते बनले मृत्यूचा सापळा!

नाहाटा महाविद्यालय व वेल्सपन ग्रुपचा उपक्रमात डिवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांचे प्रतिपादन
वाहतुकीचे नियम माहीत नसल्याने रस्ते बनले मृत्यूचा सापळा!

भुसावळ - Bhusawal प्रतिनिधी

भारत (India) हा सर्वात जास्त अपघात होणारा देश आहे. देशात एका दिवसात अपघातामध्ये (Accident) ४१४ लोक मृत्युमुखी पडतात, तर एका तासात १७ लोकांचा मृत्यु होतो. भारतातील अपघात मृत्यूचे प्रमाण त्यांनी आकडेवारीसह स्पष्ट करुन, रस्ता चांगला असून चालत नाही, रस्त्याचे नियम माहीत असले पाहिजे, रस्त्याचे नियम माहीत नसल्यास रस्ते मृत्यूचा सापळा बनतात. रस्त्यावरील चुकीला माफी नाही. त्यामुळे जबाबदारीने वाहतुकीचे नियम पाळणे,(Traffic Roule) जीवितासाठी आवश्यक अ असल्याचे प्रतिपादन डिवायएसी सोमनाथ वाकचौर (DYSP Somnath waghchoure) यांनी केले.

वाहतुकीचे नियम माहीत नसल्याने रस्ते बनले मृत्यूचा सापळा!
सोनगीर येथे दोन लाखाचा गुटखा जप्त

ते येथील नाहाटा महाविद्यालयात वेल्सपन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाहतुकीचे नियम व रोड सेफ्टी’ या विषयावर कार्यशाळा पार पडली. यावेळी उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही. पाटील होते. मंचावर प्रमुख पाहुणे पो.नि.राहुल गायकवाड, पीएसआय राजेंद्र सोनवणे, नाम्रपाली गोंडाणे, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी, उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.इ.भंगाळे, उपप्राचार्य प्रा.उत्तम सुरवाडे तसेच इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.

वाहतुकीचे नियम माहीत नसल्याने रस्ते बनले मृत्यूचा सापळा!
अक्कलकुवा तालुक्यात अवैध बायोडिझेल विक्री

कार्यक्रमाची रूपरेषा शिस्त समिती प्रमुख प्रा. डॉ. अनिल हिवाळे यांनी मांडली. बाजारपेठ पो.नि.राहुल गायकवाड यांनी, वाहतूक कायदा स्पष्ट करून तरूणांमध्ये कायद्याबाबत उदासीनता असल्याचे सांगितले. वाहतूक नियमाप्रमाणे नंबर प्लेट नसणे, हेल्मेट न घालने, लायसन्स नसणे अशा महत्त्वाच्या गुन्ह्यांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना जागृत केले.

वाहतुकीचे नियम माहीत नसल्याने रस्ते बनले मृत्यूचा सापळा!
गॅस एजन्सी चोरी प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

उद्घाटन सत्राचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही.पाटील यांनी तर द्वितीय सत्रात माजी विद्यार्थी पी.एस.आय राजेंद्र सोनवणे, संतोष वंजारी यांनी मार्गदर्शन केले. तिसर्‍या सत्रात, वाहतूक नियम व रोड सेफ्टी या विषयावरील पोस्टर प्रदर्शन पार पडले. या पोस्टर प्रदर्शनांमधून महाविद्यालयातील विविध ६२ पोस्टर विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यातून प्रथम पारितोषिक गायत्री बजाज, द्वितीय रितिक इंगळे, तृतीय सारंग नकवाल व दोन उत्तेजनार्थ बक्षीस ईश्वरी लढे, मेघा इंगळे यांनी पटकावले.

समारोप कार्यक्रम व बक्षीस वितरण झाले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी होते. सूत्रसंचालन प्रा. व्ही.ए.सोळुंके यांनी तर आभार प्रा. डॉ.अनिल हिवाळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिस्त समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले. त्यात प्रा.अजय तायडे, प्रा.जे.पी.पाटील, प्रा. प्रियांका मिस्त्री, प्रा.भाग्यश्री भोळे, डॉ.पी.के.पाटील, डॉ.आर.एस.नाडेकर, डॉ.डी.एम. टेकाडे, प्रा.डी.एन.पाटील, डॉ.स्मिता चौधरी, डॉ.आनंद उपाध्याय, प्रा.संगीता भिरूड, डॉ.गौरी पाटील, भगवान तायडे, यांनी सहकार्य केले. तसेच वेल्सपण फाऊंडेशनचे नाम्रपली गोंडाणे, शोयब शेख, रुपेश गायकवाड हे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.