शहरातील रस्त्यांची कामे निकृष्टच!

मक्तेदारांकडून रस्त्यांचे थातूर-मातूर काम सुरुच; नागरिकांना मनस्ताप
शहरातील रस्त्यांची कामे निकृष्टच!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांचे कामे (Road works) सुरू झाले आहे. मात्र सर्वत्र या कामांच्या गुणवत्तेवर (quality of works) प्रश्न उपस्थित (Question present) होत आहे. यात लोकप्रतिनिधी यांनी थेट रस्त्यांची पाहणी करून मक्तेदारांने तयार केलेल्या रस्त्यांच्या निकृष्ठ कामांवर प्रश्न उपस्थित केला होता. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देखील यावर लोकप्रतिनिधीनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. परंतु, असे असतांना मक्तेदारांकडून रस्त्यांचे थातूर-मातूर काम सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जळगाव शहरातील सर्वच रस्त्यांची अंत्यत वाईट आवस्था आहे. त्यात राज्य शासनाकडून मिळालेल्या निधीतून शहरातील सुमारे 10 रस्त्यांचे कामे सुरू झाले आहे. परंतु या रस्त्यांचे काम व्यवस्थित होत नसून झालेल्या रस्त्यांवर काही दिवसातच पुन्हा खड्डे पडत आहे. तसेच रस्ते तयार करतांना रस्त्यांचे स्क्रॅबींग न करता खडीचा थर आथरला जावून त्यावर डांबर मिश्रीत खडी टाकून त्यावर जाड खडी केवळ टाकली जात आहे. त्यामुळे काही दिवसात लगेच या रस्त्यावर खड्डे पडूत आहे. असेच चित्र सद्या बळिराम पेठ येथे सुरू असलेल्या रस्त्याचे कामातून दिसत आहे.

शहरातील रस्त्यांची कामे निकृष्टच!
VISUAL STORY: होय....मी घटस्फोटासाठी अर्ज दिलाय.....
शहरातील रस्त्यांची कामे निकृष्टच!
VISUAL STORY : हा विवाहित व्यावसायिक विश्वसुंदरी मानुषी छिल्लरला करतोय डेट

रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता कोण तपासणार?

जळगाव शहरात रस्त्यांचे सुरू असलेले कामे हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मक्तेदाराकडून तयार केले जात आहे. परंतु या रस्त्यांचे कामे व्यवस्थित होत नसल्याचे नागरिकांपासून ते लोकप्रतिनिधींकडून होत आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत हात वरती केले असून काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत असल्याचे सांगत आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता कोण तपासणार? असा प्रश्न आता जळगावकरांना पडला आहे.

शहरातील रस्त्यांची कामे निकृष्टच!
VISUAL STORY : आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या लेकीचं झालं बारसं

चांगल्या रस्त्यांचीही दुरुस्ती

शहरातील काही प्रभागांमधील रस्ते दुरुस्ती सुरू आहे. त्यात प्रभाग 12 मधील आस्वाद चौक ते गिरणा टाकी, कलेक्टर बंगला ते रामानंद नगर ते हरिविठ्ठल-गिरणा पंपीग हा वर्दळीचा रस्त्यावर खड्डेच खड्डे आहे. त्यात काही ठिकाणी खड्डे बुजविले, तर कुठे सुरू आहे. पण गुरूकूल कॉलनी, सुयोग कॉलनी येथील काही रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे ज्या रस्त्यांवर मोठी रहदारी त्यात हाडे खिळखीळे करणारे खड्डे हे रस्ते सोडून रहदारी नसलेले लहान रस्ते कसे काय दुरुस्ती करता आहे हा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे

शहरातील रस्त्यांची कामे निकृष्टच!
Good News # मध्य रेल्वेतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 विशेष गाड्या धावणार

रस्ते दुरुस्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

शहरातील काही प्रभागातील रस्ते दुरुस्तीचे कामे सुरू आहे. त्यात काही रस्त्यांचे डांबरीकरण झाले त्याचे फोटो, काम सुरू असल्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकून काम करत असल्याचे दाखवित आहे. परंतू त्यांच्या प्रभागातील मुख्य रस्त्यांचे अवस्था, त्याच रस्त्यांवर बुजविलेले खड्डे पून्हा पडले याच्याकडे लक्ष देण्यास त्यांना रस दिसत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com