रस्त्यांची कामे मार्गी लागण्याची शक्यता धुसर

42 कोटींच्या निधीचा पोरखेळ; महापालिका प्रशासनासमोर आव्हान
रस्त्यांची कामे मार्गी लागण्याची शक्यता धुसर
Jalgaon Municipal Corporation

जळगाव । Jalgaon । प्रतिनिधी

गेल्या काही महिन्यांपासून 42 कोटी निधीतून रस्त्यांच्या कामांबाबत निव्वळ चर्चा सुरु आहे. मान्सूनपूर्व कामे होतील असे आश्वासन मनपा प्रशासनाकडून (Municipal administration) दिले जात आहे. शासनाने दिलेल्या 42 कोटींपैकी 16 कोटी निधीतील रस्त्यांची कामे सुरु करण्याचा अळथडा दूर झाला असला तरी, 5 कोटींमुळे अद्यापही कामे सुरु झालेली नाहीत. त्यामुळे शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लागण्याची शक्यता धुसर असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

शहरातील रस्त्यांच्या विविध विकास कामांसाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 100 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. त्यापैकी 42 कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली होती. परंतु या निधीला अनेक अडथळे आलेत. कोरोना काळात राज्यशासनाने देखील या निधीला स्थगिती दिली होती. दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील (Guardian Minister no. Gulabrao Patil) व मनपातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी या निधीवरील स्थगिती उठविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. त्यानंतर या निधीतून काही प्रस्तावित कामांमध्ये बदल करण्यात आला असून आवश्यक रस्त्यांच्या कामांचा सामावेश करण्यात आला होता.

या सर्व प्रक्रियेमध्ये बराच वेळ गेल्यानंतर मक्तेदाराने बदल झालेल्या कामांना पुर्वीच्या रेट नुसार करण्यास नकार दिला होता. त्यानंतर पालकमंत्र्यांनी यात मार्ग काढत बदल न झालेल्या 16 कोटींच्या कामांना सुरुवात करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यामुळे दोन दिवसात कामे सुरु होतील अशी अपेक्षा होती. मात्र, चार दिवस उलटले तरी देखील कामांना सुरुवात झालेली नसून आता सार्वजनिक बांधकाम विभागाने मनपाचा हिस्सा असलेले 5 कोटी 10 लाख रुपये हे आरटीजीएसने स्विकारण्यास नकार दिला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी आम्हाला आरटीजीएस नको, धनादेशाद्वारे रक्कम द्या, अशी मागणी केल्यामुळे महापालिकेच्या अधिकार्‍यांची पंचाईत झाली आहे. महापालिकेचे सर्व व्यवहार सध्याच्या घडीला एनएफटी व आरटीजीएसने होत असल्यामुळे मनपा प्रशासनाकडे चेक बुकच नव्हते. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून रस्त्यांचे काम सुरु करण्याच्या विषयाला ब्रेक लागला आहे.

आता मनपा प्रशासनाकडून (Municipal administration) बँकेकडे चेकबुकची मागणी केली असून चेकबुक मिळाल्यानंतर पैसे वर्ग केले जाणार आहेत. दरम्यान,यंदा लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे.अशा स्थितीत शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचे मनपा प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com