महामार्गावर रास्तारोको आंदोलन

‘नही’ च्या अधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे; दुतर्फा वाहतूक खोळंबली
महामार्गावर रास्तारोको आंदोलन

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

महामार्गाचे काम (Highway work) करीत असतांना त्यांनी रहिवाशांना दिलेले आश्वासन पाळले नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी (citizens) राष्ट्रीय महामार्गावर (national highway) रास्ता रोको (Stop the way) केला. यावेळी महामार्गावरील दोन्ही बाजूने वाहतुक खोळंबली होती. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक (Project Director, Highways Authority) चंद्रकांत सिन्हा (Chandrakant Sinha) यांनी आंदोलकांना आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सालार नगरचा फ्लाय ओव्हर ची मागणी जुनी आहे. मात्र त्यानंतर अग्रवाल व प्रभात चौकातून फ्लाय ओव्हर झाला. परंतु सालार नगर अंडरपास मंजूर झाला नाही. तसेच नहीच्या अधिकार्‍यांकडून अंडरपास ऐवजी तात्पुरत्या स्वरूपात मोठा बोगदा करण्याचे लिखित आश्वासन दिले गेले होते ते देखील त्यांनी पुर्ण केले नाही. त्याचप्रमाणे जुन्या अंडरपास ब्रिज मधून शाळेचा रस्ता तयार करून दोघ सर्व्हीस रोड लागलीस तयार करून देतो याबाबत देखील नहीचे चंद्रकांत सिन्हा यांनी लेखी आश्वासन दिले होते.

मात्र आता ते त्याला जुमानत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी महामार्गावर दुपारच्या सुमारास रास्तारोको केला. या आंदोलनात आताऊल्ला खान, उमर शेख ,मुस्ताक बादलीवाला, मुस्ताक पटेल, एडव्होकेट अमीर शेख ,अनीस शाह, आरिफ शेख, सलीम इनामदार, अलफ़ैज़ पटेल ,अन्वर खान, जाहिद शाह,अकील मनियार, खालीद खाटिक, सहिद फयाज, खालील शेख, जुबेर देशमुख, हाजी अशरफ, मतीन सय्यद ,शब्बीर सय्यद, आरिफ शेख ,इस्माईल शहा, महिलां तर्फे आयशा मुस्ताक, आयेशा शेख, हाजरा शेख, अफसाना तय्यब, सुरय्या असिफ ,नसरीन शेख, नसीम शेख, शबाना शेख, शाळकरी विद्यार्थ्यांना तर्फे मोहम्मद जावेद आयान, आरिफ उमेर रफिक मावेस खान , साहिल अल्फा ,आसीम शेख,हमजा तय्यब ,तलहा तय्यब, अदनान मुक्तार ,साबिन अरशद, आयान अल्तमश यांच्यासह सालार व अक्सानगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

दुपारच्या सुमारास प्रलंबीत मागण्यांसाठी परिसरातील नागरिकांनी पुकारलेल्या रास्तारोको आंदोलनामुळे महामार्गावरील दुतर्फा वाहतुक खोळंबली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. दरम्यान वाहनधारकांना वाहतुकीचा नाहक त्रास सहन करावा लागला. दरम्यान शहर वाहतुक शाखेच्या पोलिसांनी तात्काळ आंदोलनस्थळी धाव घेत पर्यायी मार्गावरुन वाहतुक वळवून वाहतुक सुरळीत केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com