ट्रॅक्टर पेटविणार्‍या ग्रामस्थांविरुद्ध दंगलीचा गुन्हा

ट्रॅक्टर पेटविणार्‍या ग्रामस्थांविरुद्ध दंगलीचा गुन्हा

जळगाव । Jalgaon । प्रतिनिधी

तालुक्यातील आव्हाणे गावात अवैध वाळूच्या वाहतुक करणार्‍या ट्रॅक्टरने रिक्षाला उडविल्याने संतप्त ग्रामस्थांनी वाळूचे ट्रॅक्टर पेटवून दिल्याची घटना मंगळवारी घडली होती. याप्रकरणी दोन्ही ट्रॅक्टर मालक व चालकांसह तालुका पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळू वाहतुकीचा परवाना नसतांना गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतुक करणार्‍या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने एमएच 19 डी 6354 क्रमांकाच्या प्रवासी रिक्षा उडविल्याची घटना मंगळवारी दुपारी 3 वाजता आव्हाणे गावात घडली होती. या अपघातात युवराज वाल्डे व त्यांची पत्नी निर्मलाबाई युवराज वाल्डे या जखमी झाले. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी धडक देणार्‍या वाळूचे दोन्ही ट्रॅक्टर पेटवून दिले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि नयन पाटील हे करीत आहे.

ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

ट्रॅक्टर मालकांसह चालक सुनिल अशोक पाटील रा. आव्हाणे, चालक रेवसिंग उर्फ राहुल विरसिंग बारेला मूळ रा. मध्यप्रदेश ह.मु. आव्हाणे यांच्यासह जगदिश बाबुलाल ढोले, देवेंद्र दत्तात्रय पाटील, किरण पांडुरंग ढोले, काशिनाथ शिवाजी ढोले, सैय्यद इकबाल सैय्यद गफार, शेख रऊफ शेख युसूफ सर्व रा. आव्हाणे ता. जळगाव यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा करण्यात आला आहे.

धडक देणार्‍या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध कारवाई

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवून रिक्षातील प्रवासींना जखमी करुन वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी एमएच 19 डी 6354 क्रमांकाच्या ट्रॅक्टरवरील चालकाविरुद्ध युवराज हरिचंद्र वाल्डे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com