
अमळनेर Amalner प्रतिनिधी
दुचाकीवर (bike) येऊन घोषणाबाजी (Sloganism) करीत धार्मिक तेढ (religious violence) निर्माण केल्या दोन गटात (two groups) दंगल (Riot) उसळून दोेघे जखमी झाल्याची घटना शहरातील झामी चौकात रात्री घडली. यात सचिन महाजन आणि मनोज महाजन हे दोेघे जखमी (wounded) झाले असून याप्रकरणी सुमारे ३० ते ३५ जणांवर अमळनेर पोलिसांत (Amalner Police) दंगलीचा गुन्हा (Crime of Riot) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली असून शहरात तणावपूर्ण (tense silence in the city) शांतता आहे. तर शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नवरात्रोत्सवानिमित्ताने ८ रोजी संध्याकाळी जय भवानी नवरात्र उत्सव मंडळाने भंडारा आयोजित केला होता. भंडाऱ्याचा कार्यक्रमानंतर कार्यकर्ते हे भांडे घासत असताना रात्री १२.१५ वाजेच्या सुमारास माळीवाडाकडून झामी चौकाकडे ३० ते ३५ जण मोटारसायकलवर मोठमोठ्याने हॉर्न वाजवत आले.
तसेच साहेम टेन्ट हाउस दुकानाजवळ आल्यावर मोटारसायकल थांबवून मोठमोठ्याने धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण होईल, अशा घोषणा देवू लागले. त्यावेळी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे सचिन अशोक महाजन (वय २५) यांच्यासह मनोज महाजन, शेखर नाथबुवा, गणेश महाजन यांनी आरडाओरड का करत आहात, याबाबत विचारले असता झामी चौकाकडून नावीद शेख, नइम पठाण, गुलाब नबी, साहील पुर्ण नाव माहीत नाही व इतर ३० ते ३५ अनोळखी लोकांनी दगडफेक करत शिवीगाळ करू लागले.
त्यावेळी नावीद शेख याने दगड फेकुन मारल्याने सचिन अशोक महाजन यांच्या डोक्याला मागील बाजुस लागून त्यांचे डोके फुटुन दुखापत झाली आहे. त्याचवेळी तेथे गल्लीतील आजुबाजुचे पुरुष व महिला मध्यस्थी करण्यासाठी आले असता त्यांना देखील दगडांचा मार लागला आहे. याच वेळी चंदनपीर बाबाच्या दर्गा कडील गल्लीतून देखील जोरात दगडफेक झाल्याने मनोज महाजन व इतर लोकांना तसेच महिलांना देखील मार लागला आहे. तर सचिन महाजन यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने रक्तस्त्राव होऊ लागला.
त्यामुळे त्यांना गणेश महाजन, शेखर नाथबुवा यांनी औषधोपचारासाठी डॉ. शेलकर यांचेकडे घेवुन गेले. तेथे प्राथमिक औषधोपचार करून सचिन महाजन यांनी फिर्यादी दिली. यावरुन नावीद शेख, नइम पठाण, गुलाम नबी, साहील आणि अन्य ३० ते ३५ जण (सर्व रा. झामी चौक) यांच्यावर भादवि कलम ३२४, ३३७, १४३, १४७ आणि १४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या आदेशाने पोलीस उप निरीक्षक गंभीर शिंदे पुढील तपास करीत आहेत.
यांनी मिळवले दंगलीवर नियंत्रण
परिस्थिती हाताबाहेर जाऊन नये म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधीक्षक राकेश जाधव, पोलिसनिरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, उपनिरीक्षक नरसिंह वाघ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, इंगळे, उपनिरीक्षक शिरोडे यांच्यासह तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, मंडळ अधिकारी दिनेश सोनवणे, शहर तलाठी गणेश महाजन यांनी घटनास्थळी धाव घेऊन
परिस्थिती नियंत्रणात आणली.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी सांगितले की, दोन्ही समाजातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई एवढ्यारच थांबनार नसून पुढील काळातही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अतिरिक्त तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तर पोलिस त्याना दडपून आणि झोडपून काढतील. त्यामुळे सण उत्सव आनंदी वातावरणात साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
दुसऱ्या गटातर्फेही फिर्याद दाखल
दुसऱ्या गटातर्फे इम्रान अन्सारी यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक ९ ऑक्टोबर रोजी पहाटे साडे बारा वाजता विशाल चौधरी, मनोज ठाकरे, दीपक पाटील, महेश केबलवाला, अजय नाथबुवा आणि त्यांच्यासोबत १० ते १५ लोकांनी त्यांचे सायकल दुकान व शेजारील फारुख शेख यांचे फर्निचर दुकानाची तोडफोड करून साहित्य बाहेर फेकले होते. दोन्ही दुकानांचे सुमारे साडे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला दंगलीचा व नुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.