तब्बल 32 वर्षांनंतर गैरसमजातून दंगल

ना. गुलाबराव पाटील यांचा दावा ; दोषींवर कारवाई होणार
तब्बल 32 वर्षांनंतर गैरसमजातून दंगल

जळगाव । Jalgaon । प्रतिनिधी

तब्बल 32 वर्ष तपस्या करून मी त्या गावात एकही भानगड होऊ दिली नाही. माझ्या जीवनातील हा सर्वात वाईट प्रसंग आहे. 32 वर्षानंतर गैरसमजातून ही दंगल झाल्याचा दावा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.

धरणगाव तालुक्यातील पाळधी ह्या पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांच्या गावात वणीला जाणार्‍या पालखीवर समाजकंटकांनी रात्रीच्या सुमारास दगडफेक केली. या दगडफेकीमुळे गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांवरही काहींनी दगडफेक करून वाहनांचे मोठे नुकसान केले. काही पोलिसही यात जखमी झाले आहे. याप्रकरणी संशयितांचा शोध सुरू आहे.

यासंदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, पाळधी या गावात दर पाच वर्षाला दंगल होत होती हा पोलीस रेकॉर्ड आहे. पण मी 1992 नंतर या गावात एकही भानगड होऊ दिली नाही. बाहेरून पालखी आली आणि आमच्या गावात दंगल झाली. प्रार्थनेच्यावेळी डीजे बंद करण्यावरून वाद झाला आणि त्यानंतर ही दंगल घडली. गैरसमाजातूनच हा प्रकार घडला आहे. दोन्ही बाजूकडील लोक हे आपलेच आहेत. त्यामुळे यात जे दोषी असतील ते सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. आत्तापर्यंत 70 जणांना अटक झाली असून दोषी कार्यकर्त्यांवर कारवाई होईलच असे ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com