अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा

अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा

पिंपळगाव हरे., ता.पाचोरा (वार्ताहर) pachora

अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील दोन आरोपींना पाचोरा न्यायालयाने (Pachora Court) तिन महिने सश्रम कारावास व प्रत्येकी तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे अवैध रित्या दारू विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिसस्टेशन (police) हद्दीत खंडु माळी व संजय शिंदे हे अवैध रित्या दारू विक्री करत असल्याबाबत पोलिस शिरस्तेदार उज्वल जाधव यांनी सन २०२१ मध्ये पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे नोंदविले होते.

या प्रकरणी पाचोरा न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत आज प्रथम वर्ग सह दिवाणी न्यायाधिश श्रीमती एम. जी. हिवराळे यांनी सी. आर. पी. सी. २५२ (२) प्रमाणे दोघेही आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी ३ महीने सश्रम कारावासाची व प्रत्येकी ३ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

जिल्ह्यातील हा पहिलाच निकाल आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे विशेष सहा. सरकारी अभियोक्ता अनिल पाटील यांनी काम पाहिले व त्यांना पैरवी पोलिस कर्मचारी म्हणुन प्रदिप पाटील व केसवाच राजेंद्र पाटील यांनी मदत केली.

पाचोरा न्यायालयाने दिलेला हा निकाल जळगाव जिल्ह्यातील अवैध धंदे करणारांसाठी झणझणीत अंजनच आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर,शिंदाड,वरखेडी कुऱ्हाड, पिंप्री, या गावातून आजही मोठ्या प्रमाणात गावठी दारु निर्मिती व विक्री सुरु. हे अवैध धंदे बंद करण्यासाठी आजपर्यंत कायद्याच्या रक्षकांनी वारंवार कारवाया केल्या आहेत मात्र साक्षीदार व इतर त्रुटींमुळे सहसा गुन्हा सिद्ध झाला नाही किंवा तो होत नाही. यामुळे या अवैध धंदे करणारांची हिंमत दिवसेंदिवस वाढतच होती.

या निकालामुळे कुऱ्हाड गावासह संपूर्ण तालुक्यातील अवैध धंदे करणारांची पायाखालची जमीन सरकली असून या निकालाबाबत सर्वसामान्य जनतेतून व महिला वर्गातून मा. न्यायालय तसेच सरकारी वकील व पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com