सकारात्मक कामे करणार्‍यांना पुरस्काराने मिळतेय ‘ऊर्जा’

पद्मश्री निलिमा मिश्रा यांचा आशावाद; शिवपुत्र महाराष्ट्र गौरव, शिवकन्या महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण
सकारात्मक कामे करणार्‍यांना पुरस्काराने मिळतेय ‘ऊर्जा’

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

कोरोनाच्या (Corona) काळात काही समाजातील चांगुलपणा असणार्‍या माणसांनी सकारात्मक कामे (Positive works) केली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योजक व प्रशासकीय अशा विविध क्षेत्रातही चांगले काम करणार्‍यांचा शोध घेऊन शिव छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशिय संस्थेने (Shiv Chhatrapati Sambhaji Raje Multipurpose Institution) त्यांच्या कार्याचा गौरव (glory of work)केला. हा पुरस्कार त्यांना जगण्याची ऊर्जा (energy of survival) देईल, असा आशावाद मॅगसेसे पुरस्कार विजेत्या पद्मश्री निलिमा मिश्रा (Padma Shri Nilima Mishra) यांनी व्यक्त केला.

शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुद्देशीय संस्था, नाशिक या संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव व शिवकन्या महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुरस्कार-2020 या सोहळ्याचे वितरण रविवारी कांताई नाट्यगृह येथे पार पडले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी दैनिक ‘देशदूत’चे संपादक हेमंत अलोने होते. या पुरस्कार सोहळ्यासाठी संतोष मराठे, अनिल निकम, संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ निकम, नाशिक विभागीय महसूल उपायुक्त गोरक्ष गाडीलकर, जि.प.शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, अनिल पाटील, सुवर्णा रोकडे,मखनलाल मुंदडा,मंगला करोडपती,पोलीस निरीक्षक देवीदास ठोंबरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पुजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून तथा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योजक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांना शिवपुत्र महाराष्ट्र गौरव व शिवकन्या महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यात नाशिक विभागीय महसूल उपायुक्त गोरक्ष गाडीलकर, अनिल पाटील, शहीद सतीश रोकडे, मखनलाल मुंदडा, पोलीस निरीक्षक देवीदास ठोंबरे यांना शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार शाल,स्मृतीचिन्ह,सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

नगरदेवळ्याचे स्वातंत्र्य सैनिक शहीद सतीश रोकडे यांचा पुरस्कार त्यांच्या पत्नी सुवर्णा रोकडे यांनी स्वीकारला. तसेच जि.प.शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, मंगला करोडपती यांना शिवकन्या महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्यात सामाजिक, राजकीय, शिक्षण आणि प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत गुणीजनांचा गौरव करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात पद्मश्री निलिमा मिश्रा यांना मुक्ताईनगरच्या संस्थेकडून जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

प्रस्ताविक शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुद्देशीय संस्थेचे जगन्नाथ पाटील यांनी तर सूत्रसंचालन शिल्पा फासे यांनी केले. आभार जगन्नाथ पाटील यांनी मानले.

चांगले काम करणार्‍यांच्या पाठीवर गौरवाची थाप नाशिक विभागीय महसूल उपायुक्त गोरक्ष गाडीलकर यांच्यासह त्यांच्या टीमने कोरोना काळात चांगले काम केले. दैनंदिन जीवनात सकारात्म काम करीत दिवसाची सुरुवात करावी.प्रत्येकाने समाजात वाईट शोधण्यापेक्षा सकारात्मक व चांगले काम करण्याची निवड करणे गरजेचे आहे. शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुद्देशीय संस्थेने आज विविध क्षेत्रातील व्यक्तींना शिवपुत्र महाराष्ट्र गौरव व शिवकन्या महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुरस्कार देवून त्यांच्या पाठीवर गौरवाची थाप मारणे महत्वाचे आहे, असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष दैनिक ‘देशदूत’चे संपादक हेमंत अलोने यांनी व्यक्त केले.

...तर हा पुरस्कार सर्वांना सर्मपित

प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी खांद्याला खांदा लावून काम केले.एनजीओ, अंगणवाडीसेविका यांनी कोरोना रुग्ण शोधण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली. शिवपुत्र महाराष्ट्र गौरव हा माझा सन्मान असला तरी त्याचे श्रेेय सर्वांना जाते. हा पुरस्कार सर्वांना सर्मपित करतोल, असे विचार नाशिक विभागीय महसूल उपायुक्त गोरक्ष गाडीलकर यांनी मांडले. यावेळी जि.प.शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, अनिल पाटील,मखनलाल मुंदडा,मंगला करोडपती,पोलीस निरीक्षक देवीदास ठोंबरे आदींनी मनोगत व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com