जिल्ह्यातील 15 नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेचा सुधारित कार्यक्रम जाहीर

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य निवडणुक आयोगाकडून निवडणुकीची तयारी
जिल्ह्यातील 15 नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेचा सुधारित कार्यक्रम जाहीर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local body) निवडणुकांचा कार्यक्रम (election program) जाहीर (announced) करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील 15 नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेचा (Municipal ward structure) सुधारीत कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. अ,ब आणि क अशा तिन टप्प्यात हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.

जिल्ह्यातील 15 नगरपरिषदांची मुदत डिसेंबर 2021 अखेर संपुष्टात आली आहे. या नगरपरिषदांवर प्रशासक (Administrator on the Municipal Council) नियुक्त आहेत. ओबीसी आरक्षणासाठी निवडणुका स्थगित ठेवण्याबाबत राज्य शासनाने कायदादेखील केला मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC reservation) निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे राज्य निवडणुक आयोगाने राज्यातील नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेचा (election)सुधारीत कार्यक्रम जाहीर करुन निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.

असा आहे कार्यक्रम

राज्य निवडणुक आयोगाने अ,ब आणि क अशा तिन टप्प्यात नगरपरिषदांचे (Municipal Council) वर्गीकरण करुन, प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात भुसावळ नगरपालिका अ वर्गात असून, ब वर्गातील अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, पाचोरा आणि क वर्गातील भडगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, पारोळा, सावदा, यावल, रावेर, नशिराबाद या नगरपरिषदांसाठी प्रभाग रचनेवर (Division formation) दि. 10 ते 14 मे या कालावधीत हरकती व सूचना मागविल्या आहेत. दि. 23 मे रोजी हरकतींवर (Hearing on objections) जिल्हाधिकार्‍यांकडे (District Collector) सुनावणी होणार आहे. दि. 30 मे रोजी हरकती व सुचनांचा अहवाल राज्य निवडणुक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. दि. 6 जून रोजी अंतिम प्रभाग रचनेस मान्यता दिली जाणार आहे.

Related Stories

No stories found.